शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 10:32 IST2020-11-16T10:31:52+5:302020-11-16T10:32:03+5:30

Akola News शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाच्या मदतीचा लाभ देण्यात येणार आहे.

13 cases of farmer suicides eligible for help! | शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणासंदर्भात तातडीने मदत देण्याबाबत १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, १२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. शेतकरी आत्महत्यांच्या सहा प्रकरणांत फेरचाैकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या ३१ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. तर सहा शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचाैकशी करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्हास्तरीय समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मदतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणांत, संबंधित शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाच्या मदतीचा लाभ देण्यात येणार आहे.

Web Title: 13 cases of farmer suicides eligible for help!