अकोला: जिल्हयातील काटेपूर्णा जलाशयाभोवत वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वनविभागाद्वारे दुर्मिळ पक्ष्यांची गणना उपक्रम राबविण्यात आला असून, या दरम्यान दुर्मिळ पक्ष्यांच्या तब्बल १२५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.काटेपुर्णा अभयारण्यातील दुर्मिळ पक्षी व त्यांच्या प्रजाती यांची गणना करण्याकरीता २५ फेब्रूवारी रोजी एक दिवसीय पक्षी निरीक्षण व गणना करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात अभयारण्याच्या चार भागांमधील पक्षी मोजण्यात आले. या अंतर्गत १२५ प्रकारच्या पक्षी प्रजाती नोंदवण्यात आल्या. ज्यामध्ये अभयारण्याचा भाग असलेल्या काटेपुर्णा जलाशयात आॅस्प्रे, ब्लॅकस्टॉर्क, व युरेशीयन थीकंनी या महत्वपुर्ण नोंदी ठरल्या. तर जंगल प्रजाती पक्षांमध्ये लेसर यलोनॅप वुडपेकर या दुर्मीळ सुतार पक्षांची नोंद घेण्यात आली. तसेच सल्फर वेलीड बार्बलर, ट्री पीपीट, ब्लॅक नॅप मोनार्च, आॅरेंज हेडेड थ्रश, अल्ट्रा मरीन फ्लायकॅचर, एशीयन पॅरॉडाईज फ्लायकॅचर, विशेष नोंदी घेण्यात पक्षीमित्रांना यश आले.अभयारण्यात रात्रीच्या मुक्कामाला येणारे हजारो पोपट व त्यात अधिक प्रमाणात असलेले अलॅक्झेंड्रीन पॅरॅकीट (आययूसीएन च्या यादीत दुर्मिळ स्थितीत आहेत) असणे ही बाब वैशिष्टयपुर्ण आहे. तसेच पश्चिम घाटातील मुळचा असणारा पिवळ्या मानेचा सुतार व इतर काही दुर्मिळ पक्षांच्या नोंदी काटेपुर्णा अभयारण्यात होणे ही बाब उत्साहवर्धक ठरली. अनेक दुर्मिळ पक्षांचा वावर या अभयारण्यात असल्याने या अभयारण्याकडे ‘पक्षी अभयारण्य’ या दृष्टीकोनातून बघणे व पुढची काळजी घेणे गरजेचे आहे. काटेपुर्णा अभयारण्य हे पर्यटनाचे दृष्टीने निसर्गरम्य स्थान असून, लगतच्या वनराईमुळे पक्षांना आश्रय घेण्यास काटेपुर्णा अभयारण्य हे एक आदर्श आश्रयस्थान आहे.
काटेपुर्णा अभयारण्यात आढळल्या पक्ष्यांच्या १२५ प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:14 IST
अकोला: जिल्हयातील काटेपूर्णा जलाशयाभोवत वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वनविभागाद्वारे दुर्मिळ पक्ष्यांची गणना उपक्रम राबविण्यात आला असून, या दरम्यान दुर्मिळ पक्ष्यांच्या तब्बल १२५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
काटेपुर्णा अभयारण्यात आढळल्या पक्ष्यांच्या १२५ प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती
ठळक मुद्दे २५ फेब्रूवारी रोजी एक दिवसीय पक्षी निरीक्षण व गणना करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. काटेपुर्णा जलाशयात आॅस्प्रे, ब्लॅकस्टॉर्क, व युरेशीयन थीकंनी या महत्वपुर्ण नोंदी ठरल्या.जंगल प्रजाती पक्षांमध्ये लेसर यलोनॅप वुडपेकर या दुर्मीळ सुतार पक्षांची नोंद घेण्यात आली.