शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
3
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
4
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
5
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
6
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
7
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
8
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
9
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
11
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
12
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
13
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
14
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
15
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
16
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
17
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
18
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
19
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
20
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...

अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:11 PM

जिल्ह्यातील अल्पभूधारक १ लाख २३ हजार ८०४ शेतकºयांना प्रतिमाह ‘पेन्शन’चा लाभ मिळणार आहे.

- संतोष येलकरअकोला : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक व सीमांत शेतकºयांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अल्पभूधारक १ लाख २३ हजार ८०४ शेतकºयांना प्रतिमाह ‘पेन्शन’चा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची नोंदणी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.प्रधानमंत्री किसान मानधन योजना गत ९ आॅगस्टपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (सेतू) लाभार्थी शेतकºयांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकºयांना कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी या योजनेमध्ये पात्र असून, यासंदर्भात गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत शेतकºयांना माहिती देऊन, नोंदणीसाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना १६ आॅगस्ट रोजी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून, योजनेंतर्गत जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ लाख २३ हजार ८०४ अल्पभूधारक शेतकरी असून, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत संबंधित पात्र लाभार्थी शेतकºयांना प्रतिमाह ३००० रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यात असे आहेत अल्पभूधारक शेतकरी!तालुका                   शेतकरीअकोला                  २०५७५बार्शीटाकळी           १५४७५अकोट                    २३८६७तेल्हारा                  १९९३९बाळापूर                  १७१११पातूर                      १३४१९मूर्तिजापूर               १३४१८............................................एकूण                       १२३८०४लाभार्थी शेतकºयांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’!प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत गावनिहाय लाभार्थी शेतकºयांच्या नोंदणीसाठी शिबिरे (कॅम्प) तसेच लाभार्थी शेतकºयांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांना ‘पेन्शन कार्ड’ मिळणार आहेत.शेतकºयांना भरावा लागणार विमा हप्ता!प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांच्या नोंदणीनंतर संबंधित शेतकºयांना लाभार्थी हिस्सा रकमेपोटी वयानुसार कमीत कमी ५० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करावी लागणार आहे. शेतकºयांना भराव्या लागणाºया विमा हप्त्याच्या रकमेत ५० टक्के रक्कम शासनामार्फत भरण्यात येणार आहे आणि वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकºयांना प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत अल्पभूधारक लाभार्थी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्याच्या सूचना तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांच्या संचालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची बैठक १९ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना