शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीमुळे दोन महिन्यांत १२१ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 14:17 IST

अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटनांमध्ये वाढच होत असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ९९ जणांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देजुलै- २१, आॅगस्ट- ७७, त्यापूर्वीच्या मिळून १२१ विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात तब्बल ९९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली.आॅगस्टमध्ये ७७ शेतकरी, मजुरांना झालेल्या विषबाधेच्या घटनांमध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटनांमध्ये वाढच होत असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ९९ जणांना विषबाधा झाली, त्यापैकी एकाचा मृत्यू, तर गंभीर असलेल्या १३ जणांवर ३१ आॅगस्टपर्यंतच्या काळात उपचार सुरू असल्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कृषी विभागाला दिला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून १२१ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याची माहिती आहे.गेल्यावर्षीच्या संपूर्ण खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. तोच प्रकार यावर्षीही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी राज्यात कीटकनाशकांची हाताळणी विषबाधा आणि शेकडो मृत्यूच्या घटनांची पडताळणी उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केली. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या होत्या.ऊस पिकासाठी शिफारस केलेले कीटकनाशके, ज्या भागात ते पीक घेतले जात नाही, तेथेही पुरवठा करण्यात आले. त्या कीटकनाशकांची शिफारस केलेल्या पिकांचा पेरा नसताना इतर पिकांसाठी त्याचा वापर केल्याने शेतकरी आणि मजुरांना विषबाधा झाल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार घडल्यास कारवाईसाठी जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा मंडळाने राज्याच्या कृषी विभागाला दिला. आता अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात तब्बल ९९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली. त्यापैकी आॅगस्टमध्ये ७७ शेतकरी, मजुरांना झालेल्या विषबाधेच्या घटनांमध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे. १३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. जुलै- २१, आॅगस्ट- ७७, त्यापूर्वीच्या मिळून १२१ विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता कुणावर कारवाई निश्चित होते, हे लवकरच पुढे येणार आहे.

कंपनी-कृषी अधिकारीही जबाबदारउत्पादक कंपन्यांनी कीटकनाशकांचा पुरवठा करताना त्या भागातील पीक पद्धती, त्या पिकांसाठी केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांनी शिफारस आणि मंजुरी दिलेल्या कीटकनाशकांचाच पुरवठा करावा, असे निर्देश देण्यात आले. पीकनिहाय शिफारस असलेले कीटकनाशक एखाद्या भागात ते पीक नसताना पुरवठा केल्यास कारवाई केली जाणार आहे. कीटकनाशकांची साठवणूक, वितरण, विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कृषी विभागाचे सर्व संबंधित अधिकारी आणि कंपनीवरही कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयFarmerशेतकरीagricultureशेती