११ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:40 IST2018-09-11T17:40:04+5:302018-09-11T17:40:26+5:30

अकोला : अकरा वर्षीय मुलगी घरी एकटीच असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री कृषी नगरमध्ये घडली. या प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

11-year-old girl commits suicide | ११ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

११ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला : अकरा वर्षीय मुलगी घरी एकटीच असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री कृषी नगरमध्ये घडली. या प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अंजली सुरेश बेलेकर असे मृतक मुलीचे नाव आहे. अंजलीचे वडील सुरेश बेलेकर हे आॅटोरिक्क्षा चालवतात. सोमवारी दुपारी सुरेश बेलेकर हे पत्नी व लहान मुलासह कपडे घेण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते. मुलगी अंजली ही मोठी बहीण अस्मिता शाळेतून घरी येणार असल्याने घरीच थांबली होती. आई घरी आल्यानंतर तिला अंजली गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. अंजलीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: 11-year-old girl commits suicide