शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’

By atul.jaiswal | Updated: October 19, 2018 13:16 IST

गत पाच वर्षांत १०८ क्रमांकाची ही सेवा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांसाठी संकटमोचक ठरली आहे.

ठळक मुद्दे २०१४ पासून ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात आरोग्य सुविधांनी सज्ज असलेल्या ९३७ रुग्णवाहिका विविध ठिकाणी सेवारत आहेत.१०८ हा आपत्कालीन क्रमांक डायल केल्यास काही मिनिटांमध्ये रुग्णवाहिका संबंधितांपर्यंत पोहोचते.

अतुल जयस्वाल,अकोला : आरोग्य विभागाने ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या सहकार्याने सुरू केलेली रुग्णवाहिका सेवा कुचकामी ठरत असल्याची टीका होत असली, तरी गत पाच वर्षांत १०८ क्रमांकाची ही सेवा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांसाठी संकटमोचक ठरली आहे.आपत्कालीन परिस्थितीत जलद वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने २०१४ पासून ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या कंपनीचे सहकार्य घेण्यात आले असून, राज्यभरात आरोग्य सुविधांनी सज्ज असलेल्या ९३७ रुग्णवाहिका विविध ठिकाणी सेवारत आहेत. ही सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संलग्न असून, दूरध्वनीवरून १०८ हा आपत्कालीन क्रमांक डायल केल्यास काही मिनिटांमध्ये रुग्णवाहिका संबंधितांपर्यंत पोहोचते. ग्रामीण भागांमध्ये आरोग्यविषयक सुविधा जलदगतीने पोहोचाव्या, या उद्देशाने सुरू झालेली ही सेवा अनेक रुग्णांसाठी प्राणरक्षक ठरली आहे. अपघातातील जखमी, गर्भवती महिला, हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण, विष प्राशन केलेले, आगीत जळालेल्यांना जलदगतीने रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ही सेवा अवितरणपणे करीत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये २०१४ ते १२ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्याची आकडेवारी आहे.अपघातग्रस्तांसाठी प्राणरक्षकअपघातात जखमी झालेल्यांसाठी पहिला तास महत्त्वाचा असतो. या तासाभरात आवश्यक उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता असते. १०८ क्रमांकाची ही सेवा अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत असल्याने त्यांच्यासाठी ती प्राणरक्षक ठरली आहे.गत पाच वर्षांतील आकडेवारीजिल्हा लाभार्थीअकोला ५७,०७०अमरावती १,०९,६१३बुलडाणा ७२,८००वाशिम ४५,७५९यवतमाळ ७९,८८८--------------------------------एकूण ३,६५,१३०

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य