८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना १० टक्के वाढ
By Admin | Updated: June 4, 2014 22:03 IST2014-06-04T20:33:28+5:302014-06-04T22:03:29+5:30
८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना राज्यसरकारने सरसकट १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना १० टक्के वाढ
अकोला - ८० वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकांना राज्य सरकारने सरसकट १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये निवृत्ती वेतनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सहाव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार १ जानेवारी २००६ पासून ८० ते ८५ वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना २० टक्के वेतनवाढ, ८५ ते ९० वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना ३० टक्के, ९० ते ९५ वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना ४० टक्के, ९५ ते १०० वर्ष वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना ५० टक्के अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश आहेत. मात्र राज्य निवृत्ती वेतनधारकांना सरसकट केवळ १० टक्के वेतनवाढ दिली आहे.