शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
5
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
6
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
7
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
8
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
9
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
10
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
11
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
12
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
13
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
14
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
15
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
16
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
17
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
18
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
19
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
20
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
Daily Top 2Weekly Top 5

१0 लाखांच्या फसवणूकप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल नाही

By admin | Updated: July 15, 2014 01:00 IST

१0 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार जुने शहर पोलिसांना देऊनही पोलिसांनी अद्यापपर्यंंंत कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची तक्रार दीपक गावंडे यांनी केली.

अकोला : रिधोराजवळील शेतामध्ये गजानननगरी नावाने प्लॉट विकण्यासाठी विविध आमिष दाखवून गजानन इन्फ्राव्हेंचर प्रा. लि. चा सतीश विलासराव नरहरशेट्टीवार व अन्य तिघांनी १0 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार जुने शहर पोलिसांना देऊनही पोलिसांनी अद्यापपर्यंंंत कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची तक्रार दीपक गावंडे यांनी केली. दीपक गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन इन्फ्राव्हेंचर प्रा.लि.चा संचालक व बिल्डर सतीश नरहरशेट्टीवार, साईट सुपरवायझर दुष्यंत सोळंके व त्यांचे सहकारी चंद्रकांत खडसे, प्रफुल्ल मून यांनी रिधोराजवळ शेत गट नं. २३, प्लॉट नं. ४३ पार्ट १ मध्ये गजानननगरी या नावाने प्लॉट विकण्यासाठी लोकांना ४ लाखांचा विमा, शुभारंभाच्या दिवशी प्लॉट विकत घेतला तर मोटारसायकल उपहार देण्यात येईलरू असे आमिषं दाखवली. सतीश नरहरशेट्टीवार याने आपल्याला शेताचा मालक असून, या शेतीवर १५ महिन्यांमध्ये गजानन नगरी उभी राहील, असे सांगितले. त्यावर २२१९.२५ चौ. फुटाचा प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. ईसारापोटी ३ लाख रुपये दिले. उर्वरित ८ लाख ६५ हजार रुपये योजना सुरू झाल्याच्या तारखेपासून १५ महिन्यांच्या मुदतीपर्यंंंत भरण्यास सांगितले. त्यानुसार आप, १६ एप्रिल १३ ते १८ एप्रिल १४ पर्यंंंत दर महिन्याला ५८ हजार रुपये भरले. त्याच्या पावत्यासुद्धा देण्यात आल्या. परंतु नरहरशेट्टीवार व त्याच्या सहकार्‍यांनी शेतावर कोणतीही गजानननगरी उभारली नाही. नरहरशेट्टीवार याच्या नावावर कोणतेही शेत नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने आपल्यासोबत अनेक लोकांची कोट्यावधी लोकांची फसवणूक केली. त्यामुळे त्याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दीपक गावंडे यांनी केली आहे. परंतु जुने शहर पोलिसांनी अद्यापपर्यंंंतही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.