जिल्हा परिषदेने भरली १०० टक्के अनुकंपावरील पदे, १२२ जणांना नियुक्त्या 

By चंद्रकांत शेळके | Published: July 11, 2023 07:58 PM2023-07-11T19:58:15+5:302023-07-11T19:58:24+5:30

गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेली अनुकंपा तत्त्वावरील पदभरती जिल्हा परिषदेने अखेर पूर्ण केली.

Zilla Parishad filled 100 percent compassionate posts, 122 appointments | जिल्हा परिषदेने भरली १०० टक्के अनुकंपावरील पदे, १२२ जणांना नियुक्त्या 

जिल्हा परिषदेने भरली १०० टक्के अनुकंपावरील पदे, १२२ जणांना नियुक्त्या 

googlenewsNext

अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेली अनुकंपा तत्त्वावरील पदभरती जिल्हा परिषदेने अखेर पूर्ण केली. विशेष म्हणजे या वेळी सर्व म्हणजे १२२ जणांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यामुळे आता जिल्हा परिषदेकडे अनुकंपावरील एकही जागा रिक्त नाही. शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास ज्येष्ठता क्रमाने वर्ग-३ व वर्ग-४ पदावर समुपदेशनाने शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम यापूर्वी गट क ची अर्हता धारण करणारे परंतु जागा उपलब्धतेअभावी गड-ड मध्ये पदस्थापना दिलेल्या एकूण ११ कर्मचाऱ्यांना गट क संवर्गातील रिक्त पदे उपलब्ध झाल्याने प्राधान्याने गट क मध्ये पदस्थापना देण्यात आली. उर्वरित प्रतीक्षा यादीतील एकूण १२२ उमेदवारांना वर्ग ३ व वर्ग ४ पदांवर नेमणुका देण्यात आल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी समुपदेशनाने सर्व पात्र उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. यापूर्वी शासनाच्या अटी-शर्तीमुळे अनुकंपा नियुक्तीचे प्रमाण कमी होते. तथापि यावेळी या अटी व शर्तीचे पालन करून १०० टक्के अनुकंपा नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी जिल्हा परिषदेंतर्गत मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त पदांची संख्या या अनुकंपा भरतीमुळे काही प्रमाणात कमी झाली आहे.

अशा मिळाल्या नियुक्त्या

  • कनिष्ठ सहायक - १४
  • वरिष्ठ सहायक - १०
  • वरिष्ठ सहायक (लेखा) -४
  • पर्यवेक्षिका -९
  • कनिष्ठ अभियंता - ९
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - १२
  • ग्रामसेवक (कंत्राटी) - ३
  • आरोग्य सेवक - ४३
  • औषध निर्माण अधिकारी -४
  • परिचर - १०
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ -०१
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत ) -२
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी ) -१
     

Web Title: Zilla Parishad filled 100 percent compassionate posts, 122 appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.