जिल्हा परिषदेच्या ९० कामांचे प्रस्ताव नियोजनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:48 PM2017-09-12T22:48:28+5:302017-09-12T22:48:28+5:30

अहमदनगर: जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करून जिल्हा वार्षिक योजनेच्या (५०५४) निधीवर दावा ठोकला आहे़ सप्टेंबर अखेरीस होणाºया नियोजन समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार असून, पालकमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, यावर कामांचे भवितव्य अवलंबून आहे़

zilha,parishad,90,works,planninng, | जिल्हा परिषदेच्या ९० कामांचे प्रस्ताव नियोजनकडे

जिल्हा परिषदेच्या ९० कामांचे प्रस्ताव नियोजनकडे

Next
मदनगर: जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करून जिल्हा वार्षिक योजनेच्या (५०५४) निधीवर दावा ठोकला आहे़ सप्टेंबर अखेरीस होणाºया नियोजन समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार असून, पालकमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, यावर कामांचे भवितव्य अवलंबून आहे़जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रस्ते विकासाचा ( ५०५४) निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्याचा आदेश आहे़ असे असले तरी निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच खर्च होतो़ जिल्हा परिषदेच्या हक्काचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला पाहिजे, अशी जिल्हा परिषद पदाधिकाºयांची भूमिका आहे़ याबाबत मागील सभेच्यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थित अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह पदाधिकाºयांची बैठक पार पडली़ या बैठकीदरम्यान शिंदे यांनी निधीबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र अद्याप या बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही़ जिल्हा नियोजन समितीची सभा सप्टेंबर अखेरीस होण्याची शक्यता आहे़ नियोजनची ही सभा डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेने सदस्यांनी सुचविलेल्या ९० रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठविले आहेत़ सुमारे २५ कोटी रकमेचे हे प्रस्ताव आहेत़ ते अंतिम मंजुरीसाठी नियोजन समितीच्या सभेत सादर होतील़ त्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाºयांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत़ गतवर्षी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्यासह पदाधिकाºयांनी याच निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली होती़ मात्र निधी मिळाला नाही़ यंदा जिल्हा परिषदेत सत्तांतर होऊन अध्यक्ष पद काँग्रेसकडे आले आहे़ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याकडून वार्षिक योजनेतील निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे़ सदस्यांनी कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत़ निवडणुकीनंतर पहिलाच प्रस्ताव सदस्यांनी दाखल केला असून, त्यांची भिस्त विखे यांच्यावरच आहे़ अध्यक्षा शालिनी विखे याबाबत काय भूमिका घेतात़ पालकमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाल्याचे समजते़ पालकमंत्र्यांनी निधी देण्याचे कबूल केले आहे़ प्रत्यक्षात मात्र याबाबत अद्याप तोडगा न निघाल्याने या प्रस्तावाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे़ ़़़़ असे आहेत प्रस्ताव- नेवासे-९, राहुरी-७, श्रीरामपूर-७, शेवगाव-७, श्रीगोंदा-७, राहाता-१०, अकोले-१०, संगमनेर-१०, कोपरगाव-७, नगर-७, जामखेड-२, पाथर्डी-५, कर्जत-४, पारनेर-७़़़़़

Web Title: zilha,parishad,90,works,planninng,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.