ढोल, ताशे वाजवून युवकांनी केले खड्ड्यात वृक्षारोपण, नगर-मनमाड मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 02:27 PM2019-10-26T14:27:59+5:302019-10-26T14:28:35+5:30

नगर-मनमाड मार्गावर कोल्हार ते राहुरी कारखाना याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. याच्या निषेधार्थ युवकांनी एकत्रित येत ढोल, ताशे बडवत अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकांनी रस्त्यावर येऊन गांधीगीरी मार्गाने या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.

Youth trees planted in ditches by playing drums and cards | ढोल, ताशे वाजवून युवकांनी केले खड्ड्यात वृक्षारोपण, नगर-मनमाड मार्गावर खड्डेच खड्डे

ढोल, ताशे वाजवून युवकांनी केले खड्ड्यात वृक्षारोपण, नगर-मनमाड मार्गावर खड्डेच खड्डे

Next

लोणी/देवळाली प्रवरा : नगर-मनमाड मार्गावर कोल्हार ते राहुरी कारखाना याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. याच्या निषेधार्थ युवकांनी एकत्रित येत ढोल, ताशे बडवत अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकांनी रस्त्यावर येऊन गांधीगीरी मार्गाने या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
   नगर-मनमाड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. राहुरी कारखाना येथील स्टेट बँकेच्या समोर मोठे खड्डे पडले आहेत. कोल्हार बुद्रूक व खुर्द याठिकाणी हिच परिस्थिती आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी हा खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून या मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे. सध्या दिवाळी सणाचा कालावधी असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असून लहान मोठे अपघात नित्याचे झाले आहेत.
रस्ता डागडुजीबाबत अनेकांकडून अनेकदा पाठपुरावा केला जात आहे. परंतु त्याचा काही एक उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील युवकांनी एकत्रित येऊन ढोल, ताशांच्या गजरात सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत रस्त्यावर उतरून खड्ड्यात वृक्षारोपण करीत गांधीगिरी पध्दतीने आंदोलन  केले. यावेळी ‘पुढे मोठा खड्डा असून प्रशासनाला जाग येईपर्यंत वाहने सावकाश चालवा’ असे विनंती करणारे फलकही याठिकाणी लावला आहे. 
  या आंदोलनात शिवसेना, मनसे या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह  वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान, वंदे मातरम मित्र मंडळ, जय हिंद युवा मंच, व्यापारी असोसिएशन,अंबिका नगर मित्र मंडळ, ईगल सोशल संस्था, रिक्षा संघटना, सप्तशृंगी मित्र मंडळ, युवा संघर्ष प्रतिष्ठान, संघर्ष ग्रुप, युवा क्षितीज प्रतिष्ठान, चेतक ग्रुप, शांती चौक मित्र मंडळ, चेतक युवा प्रतिष्ठान या संघटना सहभागी झाल्या  होत्या.
...

Web Title: Youth trees planted in ditches by playing drums and cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.