A young girl leaves home for her boyfriends | प्रियकरासाठी दिवसाला एक अल्पवयीन मुलगी सोडते घर
प्रियकरासाठी दिवसाला एक अल्पवयीन मुलगी सोडते घर

- अरुण वाघमोडे
अहमदनगर : उमलत्या वयात शारीरिक आकर्षणातून किशोरवयीन मुले-मुली सहज एकमेकांच्या प्रेमात पडतात़ प्रियकराने दिलेले लग्नाचे आमिष आणि त्याच्या भूलथापांना बळी पडून या अल्पवयीन सहजरित्या घराचा उंबरठा ओलांडत आहेत़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ६४० अल्पवयीन मुली प्रियकराचा हात धरून पळून गेल्या आहेत़ दिवसाला एक असे हे प्रमाण आहे.
दोन वर्षांत अपनयन (पळवून नेलेले) झालेल्या अल्पवयीन मुले, मुले, महिला व पुरुषांच्या संख्येची नोंद आहे़ यामध्ये ६४० अल्पवयीन मुली, ३३ महिला, १४६ मुले तर २३ पुरुषांची नोंद आहे़ अपनयन (उचलून पळवून नेणे) झालेल्या सर्व मुली या १४ ते १८ वयोगटातील आहेत़ मुलींना पळून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे़

काय काळजी घ्यावी पालकांनी
प्रेमप्रकरणातून मुले-मुली घरातून निघून जाणे हे प्रमाण वाढत आहे़ याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत़ पाल्य चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला वेळीच समज द्यावी़
- अ‍ॅड. निर्मला चौधरी,
न्यायाधार संस्था

Web Title: A young girl leaves home for her boyfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.