विकासकामे करणार; जनतेला सन्मानही देणार-निलेश लंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:31 PM2019-10-15T12:31:09+5:302019-10-15T12:31:51+5:30

विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस तास आपण जनतेसाठी उपलब्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी अरणगाव येथे दिली.  

Work on development; Nilesh Lanke will also honor the people | विकासकामे करणार; जनतेला सन्मानही देणार-निलेश लंके

विकासकामे करणार; जनतेला सन्मानही देणार-निलेश लंके

Next

पारनेर : विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस तास आपण जनतेसाठी उपलब्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी अरणगाव येथे दिली.  
नगर तालुक्यातील गावांचा लंके यांनी दौरा केला. अरणगाव येथे ते म्हणाले, प्रत्येक मतदाराला स्वाभिमान असतो. मतदारांशी सन्मानाने बोलणे हेही लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य असते. मात्र तालुक्यातील जनतेला वाईट अनुभव आला आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांचाही आपण आदर करु. गावात भांडणे लावणे व तेथील सत्ता आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे यात आपणाला रस नाही. गावस्तरावरील नेत्यांचाही सन्मान राखला जाणे आवश्यक आहे. तेथील कारभारात आपण लुडबूड करणार नाही. मला मते द्या तरच विकास कामे करतो अशा संस्कृतीला आपला विरोध आहे. लोकांमध्ये जाऊन मिसळणे ही आपली सवय असून तसाच आपला कारभार राहील. नगर व पारनेर तालुक्यातील जुन्या नेत्यांनी माणुसकी जपली. तो आदर्श आपण विसरणार नाहीत. एका सामान्य शिक्षकाचा मुलगा म्हणून मी सतत जमिनीवर राहून काम करत आलो, असेही त्यांनी सांगितले. 
नगर बाजार समितीचे माजी सभापती गंगाधर शिंदे, पोपट गुंड, सुजित बाबू कोके,  रामभाऊ ढवारे, रमेश आजबे, लहू आजबे, सुधीर कांबळे, दिलीप कांबळे,  सागर कल्हापुरे, सुरेश जाधव, महेश पवार, सुभाष पुंड, विकी कांबळे, गौतम जाधव, संपत कांबळे, पोपट शिंदे, बबन शिंदे, बाळासाहेब दळवी, संतोष शिंदे, दशरथ शेळके, प्रशांत गहिले, नवनाथ गहिले, संजय गहिले, मोहन नाट, गोपीनाथ गहिले, बबन मुदळ आदींची उपस्थिती होती. 

Web Title: Work on development; Nilesh Lanke will also honor the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.