अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:47+5:302021-05-24T04:20:47+5:30

निंबळक : अनाम प्रेम संस्थेने कोरोनाग्रस्त रुग्णाची चांगली सेवा व उपचार केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. रुग्णाला जेवणाची सोय, तसेच ...

The work of Anamprem is commendable | अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद

अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद

Next

निंबळक : अनाम प्रेम संस्थेने कोरोनाग्रस्त रुग्णाची चांगली सेवा व उपचार केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. रुग्णाला जेवणाची सोय, तसेच मनोरंजनासाठी टेलिव्हिजनची व्यवस्था केली. रुग्णसेवेसाठी ‘अनामप्रेम’ने केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी काढले.

जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या पुढाकारातून, तसेच पंचायत समिती सभापती सुरेखा संदीप गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात चार कोविड सेंटर सुरू करण्यात आली. प्रथम या कोविड सेंटरला कोणी जागा देण्यास तयार नव्हते. इसळक येथील स्नेहालय संचलित अनापप्रेम व अरणगाव येथील मेहरबाबा संस्था यांनी इमारती उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हजारो नागरिकांना या कोविड सेंटरचा फायदा होऊन प्राण वाचले. या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची व्यवस्था पाहणारे अनामप्रेमचे पदाधिकारी व सेवेकरी यांचे कौतुक करीत सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बी. डी. कोतकर, दत्तात्रय दिवटे, दत्ता कोतकर, दत्ता मुरलीधर कोतकर, सदाशिव कोतकर, विशाल घोलप, अमोल पगारे, ज्ञानेश्वर डहाळे उपस्थित होते.

Web Title: The work of Anamprem is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.