मटणाच्या भाजीत विष देऊन पतीला ठार केलं, 8 दिवसांनी पत्नीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 08:39 PM2019-01-30T20:39:31+5:302019-01-30T20:54:02+5:30

साकुरी गावातील सुनिल बंन्सी बनसोडे व पत्नी मिना सुनिल बनसोडे हे दोघे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

The wife was arrested for poisoning her husband in dinner | मटणाच्या भाजीत विष देऊन पतीला ठार केलं, 8 दिवसांनी पत्नीला अटक

मटणाच्या भाजीत विष देऊन पतीला ठार केलं, 8 दिवसांनी पत्नीला अटक

Next

अहमदनगर - बायकोने जेवणात विष कालवून पतीला ठार मारल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अहमनगर तालुक्यातील साकुरी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुनील बन्सी असे मृत पतीचे नाव असून मीना हे पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पत्नीला अटक केली आहे. 

साकुरी गावातील सुनिल बंन्सी बनसोडे व पत्नी मिना सुनिल बनसोडे हे दोघे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, पती सुनिलकडून नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. पतीच्या या संशयी वृत्तीला कंटाळूनच पत्नीने चक्क मटणाच्या भाजीतून पतीला विष देऊन ठार मारले. सुनीलला जेवणानंतर उलट्या आणि मळमळीचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान 22 जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पत्नीला अटक केली. 

Web Title: The wife was arrested for poisoning her husband in dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.