शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

अभद्र राजकारण्यांचा ‘नगर पॅटर्न’ कशासाठी ? - डॉ. निलम गो-हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 5:07 PM

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी भेट घेतली.

ठळक मुद्देकोतकर, ठुबे कुटुंबियांची भेट

अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी भेट घेतली. नगरमध्ये दहशत माजवण्याचा काही राजकीय नेत्यांचा डाव आहे. त्यासाठी सोय-यांनी एकत्र येऊन राजकीय तडजोडी सुरु केल्या आहेत. हा अभद्र नगर पॅटर्न कशासाठी झाला. या पॅटर्नमुळे राज्याचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, असे मत गो-हे यांनी व्यक्त केले.डॉ. गो-हे यांनी कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. घटनेची पार्श्वभूमी समजून घेत त्या म्हणाल्या, नगर मध्ये सोय-यांनी एकत्र येत दहशत निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. यातूनच हे हत्याकांड घडले. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले. हे अधिकारी नगरमधून जोपर्यंत हलवले जाणार नाहीत तोपर्यंत तपास योग्य होणार नाही. याबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे. त्या पुढे म्हणाल्या, दोषारोपपत्र दाखल होणार असल्याने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम हवेत. यासाठी सीआयडीला विनंती करणार असून मृतांच्या पत्नींना स्वरक्षणासाठी शस्त्रे दिली जावीत, अशी विशेष मागणी मी अधिवेशनात करणार आहे. यावेळी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने दोन्ही कुटुंबाना प्रत्येकी एक लाखांची मदत गो-हे यांनी दिली. शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, भारत कांडेकर , अमोल येवले, पप्पू भाले व पुणे येथील सेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडNeelam gorheनीलम गो-हे