शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

कोपरगावच्या पाणी प्रश्नाबाबत वहाडणे यांनी गैरसमज पसरविले - के. एस. रेड्डी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 12:51 PM

कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाईच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे वारंवार चुकीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाईच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे वारंवार चुकीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचा खुलासा गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट के. एस. रेड्डी यांनी केला आहे. मंगळवारी  रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच नंबर साठवण तलावाच्या कामासंदर्भात घटनाक्रम सांगितला. रेड्डी म्हणाले, गायत्री कन्स्ट्रक्शनचे काम रस्ते बनविण्याचे आहे. या कंपनीमार्फत मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गाचे काम चालू आहे. या रस्त्याच्या भरावासाठी तीन किलोमीटर अंतरातून माती व मुरूम घेतला जातो. तेथील शेतक-यांना विनामूल्य शेततळे तयार करून दिले जाते. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आम्हांला १५ जानेवारी २०१९ रोजी समृध्दी महामार्ग भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरूम लागणार आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या साठवण तलाव क्रमांक ५ मध्ये खोदकाम करून माती व मुरूम उचलावा याबाबतचे पत्र दिले. कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याची दाहकता लक्षात घेऊन आम्ही या कामास संमती दिली. यावर आम्ही नगरपालिकेला पत्र देऊन तलाव ते समृध्दी महामार्ग हे अंतर १५ किलोमीटर आहे. त्यासाठी आम्हाला ५ कोटी रूपयांचा वाहतूक खर्च लागणार आहे, असे कळविले.  दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याशी या कामाबाबात सविस्तर चर्चा करून माती उचलण्यासाठी लागणारा पैसा आम्ही एकटे खर्च करू शकत नाही. पालिकेने अधिकचा खर्च द्यावा व यासंदर्भात शासकीय टेंडर काढून माती उचलण्याची परवानगी द्यावी. आवश्यक  त्या कागदपत्रांची पूर्तता पालिकेने करून द्यावी, असे  सांगितले. मात्र पालिकेने अद्याप कुठलीही कागदपत्रे आम्हाला दिलेली नाहीत.या कामासंदर्भात जिल्हाधिकारी व आपली बैठक आटोपल्यानंतर आशुतोष काळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर भेट झाली त्यावेळीही त्यांना आपण स्पष्ट कल्पना दिली की,तीन किलोमीटर अंतरातील वाहतुकीची परवानगी आहे. मात्र पालिकेचा साठवण तलाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाची माती नेण्यास आपण तयार आहोत. मात्र वाहतुकीला लागणारा खर्च नगरपालिकेने करावा. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे देखील आपल्याला दोन वेळा भेटले आहेत. त्यांनाही आम्ही वरीलप्रमाणेच सांगितले. मार्चपर्यंत रस्त्याच्या कामाला मातीची गरज आहे. तोपर्यंत नगरपालिकेने टेंडर काढावे असेही पालिकेला कळविण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव