Violation of Corona rules now carries a fine of Rs 500 | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास आता ५०० रुपये दंड

अहमदनगर : धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

धार्मिक ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, धुम्रपान न करणे, परिसरात न थुंकणे या नियमांचे उल्लंघन करणारास १०० रुपये इतका दंड होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्याबाबत जिल्हाधिका-यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. सदरचे अधिकार पोलीस नाईक ते पोलीस अंमलदार यांना देण्यात आले आहेत. 

Web Title: Violation of Corona rules now carries a fine of Rs 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.