गावोगावी रक्तदानाच्या चळवळी उभ्या राहणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:26 AM2021-02-26T04:26:53+5:302021-02-26T04:26:53+5:30

बोधेगाव : रक्तदान हे आपल्याला जगणे शिकवत असते. शिबिराच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येतात. यातून समता, बंधुता या मूल्यांची रूजवणूक ...

The village blood donation movement needs to stand up | गावोगावी रक्तदानाच्या चळवळी उभ्या राहणे गरजेचे

गावोगावी रक्तदानाच्या चळवळी उभ्या राहणे गरजेचे

Next

बोधेगाव : रक्तदान हे आपल्याला जगणे शिकवत असते. शिबिराच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येतात. यातून समता, बंधुता या मूल्यांची रूजवणूक होते. रक्तदानामुळे जातीपातीची सामाजिक दरी कायमची मिटू शकते. यासाठी गावोगावी अशा रक्तदानाच्या चळवळी उभ्या राहणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी व्यक्त केले.

शेवगाव तालुक्यातील सुकळी येथे बुधवारी (दि.२४) शिवजयंती व युवा उद्योजक हरिभाऊ भवर यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ भवर युथ फाउंडेशन व प्रहार संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, हरिभाऊ भवर, लहूराव भवर, बाबासाहेब देशमुख, प्रदीप देशमुख, लकी भवर, अनिल देशमुख आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून रक्तदानास सुरुवात केली. शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.

यावेळी अष्टविनायक ब्लड बँकेचे डाॅ. जितेंद्र पालीकुंडकर, तलाठी बाबासाहेब अंधारे, अशोक देवढे, संजय भवर, बाबासाहेब गरड, सोमेश देशमुख, अविनाश पवार, अविनाश काळे, भगवान भवर, प्रल्हाद भवर, संदीप देशमुख, शंकर देशमुख, भक्तराज चोथे, बप्पा रनमले, रामेश्वर काळे, कल्पेश दळे, पांडुरंग फासाटे, गणेश पातकळ, शंकरराव नेमाने, संतोष थोरात, राजेंद्र वांढेकर, राहुल झुंबड, राजू गवारे, कांता भवर, जय केसभट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन लहूराव भवर यांनी केले तर संदीप बामदळे यांनी आभार मानले.

Web Title: The village blood donation movement needs to stand up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.