दोन दुचाकींचा अपघात, तरुण जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 08:02 AM2021-12-22T08:02:33+5:302021-12-22T08:03:04+5:30

​​​​​​​दोन जण गंभीर जखमी

Two wheeler accident one person death on the spot Incident on Nashik Pune Highway | दोन दुचाकींचा अपघात, तरुण जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

दोन दुचाकींचा अपघात, तरुण जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

Next

घारगाव (जि. अहमदनगर) : दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात संगमनेर शहरातील एका ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि.२१) दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील वरुडी फाट्यावर हा अपघात घडला.

ॲड. शंतनू श्रीधर वैद्य (वय ३२, रा. संगमनेर) असे या अपघातातील मयत तरुणाचे नाव आहे. गणपत दत्तू जाधव (वय ५५) आणि अलका गणपत जाधव (वय ५०) (दोघेही रा. जोर्वे. ता. संगमनेर) अशी जखमींची नावे आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीवरुन प्रवास करणारे जाधव हेवरुडी फाट्याहून वरुडी येथे जाण्यासाठी वळत असताना पाठीमागून दुचाकीवरून ॲड. शंतनू वैद्य हे येत होते. समोरील दुचाकीला धडक बसू नये म्हणून त्यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी आवरण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्या ताब्यातील दुचाकी दुभाजकावर जाऊन धडकली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. सुरज ढगे यांनी अपघाताची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांना दिली. ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. ॲड. वैद्य यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कुटीर रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Two wheeler accident one person death on the spot Incident on Nashik Pune Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.