शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

लुटमार करणा-या दोघा दरोडेखोरांना अटक कारवाई: एकाच रात्री दोन ठिकाणी टाकला होता दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 5:43 PM

जामखेड परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडा टाकून लुटमार करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापूर परिसरातून अटक केली़. या गुन्ह्यातील तीन दरोडेखोर फरार आहेत़. 

अहमदनगर: जामखेड परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडा टाकून लुटमार करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापूर परिसरातून अटक केली़. या गुन्ह्यातील तीन दरोडेखोर फरार आहेत़. दीपक उर्फ सलीम नारायण भोसले (रा. वाहिरा, आष्टी, बीड) व लखन उर्फ ढोल्या नारायण भोसले अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध नगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, टेंभुर्णी, बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. गोरख नारायण भोसले, नाज्या उर्फ सोमीनाथ नेह-या काळे, रावसाहेब विलास भोसले हे तिघेजण फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बुधवारी (दि़३०) रात्री जामखेडमधील आरोळेवस्ती येथील पवन सुभाष जाधव यांच्या घरावर या आरोपींनी दरोडा टाकला होता. पवन जाधव यांची आई व घरातील इतरांना मारहाण करीत पवन जाधव यांच्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले होते. तर राजुरी येथील रणजित खाडे यांच्या घरातील लोकांना मारहाण करून सात हजार रुपये चोरून नेले होते. आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील नवाबपूर येथे नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, सोन्याबापू नानेकर, संदीप घोडके, विशाल दळवी, रवींद्र कर्डिले, रवी सोनटक्के, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, दीपक शिंदे यांच्या सापळा रचून आरोपींना अटक केली़ 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी