शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

बस-ट्रेलर अपघातात दोन ठार; २९ जखमी

By admin | Published: September 21, 2014 11:47 PM

अहमदनगर : एस़ टी़ बस व कंटेनरच्या यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना अहमदनगरजवळील इमामपूर घाटात घडली़

अहमदनगर : एस़ टी़ बस व कंटेनरच्या यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना अहमदनगरजवळील इमामपूर घाटात रविवारी (दि़ २१) पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली़ जखमींमध्ये पुण्यातील सात जणांचा समावेश असून, एक जण जागीच मयत झाला असून दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अंबड-पुणे ही बस (क्रमांक एम.एच. २०, बी.एल. २९६६) रात्री अंबडहून निघून पुण्याकडे जात होती़ ही बस अहमदनगरजवळील इमामपूर घाट चढत असताना पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एच़ आऱ ४६, सी़ ४९०३) बसला जोरदार धडक दिली़ ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या डिझेल टाकीपासून पाठीमागेपर्यंत बसचा पत्रा कापला गेला़ खिडकीच्या बाजूला बसलेले पांडुरंग राजेंद्र आळंदीकर (वय़ ६५, रा़ चंदननगर, जि़ पुणे) हे जागीच ठार झाले़ तर उपचार सुरु असताना संजय वसंत जोशी (चंदननगर, पुणे) यांचा मृत्यू झाला. बसचालक रामेश्वर आरण हे जखमी झाले असून, वाहक शेख आलमनूर हसन यांना किरकोळ मार लागला आहे़ अपघातातील जखमींना नगरच्या जिल्हा रुग्णालयात व इतर तिघांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे़ कंटनेर चालक फरार झाला असून, क्लिनर राजकुमार तेजुराम यादव (वय २७, रा़ माकीपूर, ता़ जलालपूर, जि़ आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश), शिवशंकर विजयबहादूर यादव व सिकंदर राजाराम पाल (रा़ सहलीपूर, ता़ जोनपूर, उत्तरप्रदेश) हे जखमी आहेत़ त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार चौधरी तपास करीत आहेत.(प्रतिनिधी) जखमींमध्ये संदीप बाळासाहेब झोल (वासीम, ता़ करमाळा, जि़सोलापूर), अरुण गंगाराम इंगळे (जि़बुलढाणा), कुसुम अरुण इंगळे, राजेश आनंद सराफ (रा़ सावेडी़ अहमदनगर), विनोद विठ्ठल मोडेकर (नेहरुनगर, औरंगाबाद), विनायक रमेश वाळके (औरंगाबाद), राजकुमार कार्तिक दुर्वे, तुळसाबाई देवीदास हेंद्रे (जाफराबाद), मनिषा साहेबराव बागुल (हडको, औरंगाबाद), वनिता साहेबराव बागुल (हडको, औरंगाबाद), रफिक मोहमद शेख (दापोडी, पुणे), बद्रीनारायण ज्ञानबा घुगे (मांडवा, ता़ रिसोड, जि़ वाशिम), राहुल रवींद्र चौक (नांदेड), प्रशांत गजाजन ठाकरे (अकोला), स्वप्नील राजेश इंगोले (मोरगाव,जि़अकोला), धोंडिराम जयराम नरवडे (काळेवाडी, पुणे), देवीदास सटवा हेंद्रे (वरुड,ताक़रमाळा, जि़सोलापूर), बाबासाहेब अर्जुन कदम (न्हावरे,ता़शिरुर, जि़पुणे), विश्वास काशिनाथ बानोसे (मालखेड, ता़सिंधखेडराजा, जि़बुलढाणा), सुभाष हिरालाल कर्नावट (नवीपेठ, अहमदनगर), इकबाल सरदार पटेल (निमगाव समद, ता़ जुन्नर, जि़ पुणे), शेख नवाब शेख हसन (रा़जालना), हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़