The truck overturned due to lack of sidebars; Two were injured | साईडपट्ट्याअभावी मालट्रक उलटला; दोन जण जखमी

साईडपट्ट्याअभावी मालट्रक उलटला; दोन जण जखमी

बोधेगाव : शेवगाव-गेवराई मार्गावरील ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथे शुक्रवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास कर्नाटक राज्यातून शेवगावकडे जाणारा मालट्रक उलटला. शेवगावमार्गे येणाऱ्या बसने हुलकावणी दिल्याने ट्रक रस्त्याच्या खाली घेताना खचलेल्या साईडपट्ट्यावरून घसरून ही घटना घडली. या घटनेत ट्रकमधील दोघे जखमी झाले.

कर्नाटक येथून शेवगावकडे सरकी-बी घेऊन जाणारा मालट्रक (क्र. आरजे १९ जीए ४५९५) शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास शेवगाव-गेवराई मार्गावरील ठाकूर पिंपळगाव येथे पलटी झाला. शेवगावमार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या एका बसने हुलकावणी दिली असता, ट्रक रस्त्याच्या खाली घेताना साधारणतः एक ते दीड फुटापर्यंत खोलगट झालेल्या साईडपट्ट्यावरून जोरात आदळून उलटल्याने राजस्थान येथील चालकाने सांगितले.

    या घटनेत ट्रकचालकाच्या कानाला मार लागला. तर वयोवृद्ध क्लीनर गणपतराम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमींना बोधेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड, अरूण गरड व ठाकूर पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी मदत केली.

Web Title: The truck overturned due to lack of sidebars; Two were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.