शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिध्दीत पर्यटकांना मज्जाव; अण्णा हजारे भेटणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 6:50 PM

राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. कोरोना व्हायरवर उपाय म्हणून पर्यटकांनी सध्या राळेगणसिद्धीत येऊ नये, असे आवाहन शुक्रवारी राळेगणसिद्धी परिवाराने केले आहे. ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे सुध्दा सध्या कुणालाही भेटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

 पारनेर : राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. कोरोना व्हायरवर उपाय म्हणून पर्यटकांनी सध्या राळेगणसिद्धीत येऊ नये, असे आवाहन शुक्रवारी राळेगणसिद्धी परिवाराने केले आहे. ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे सुध्दा सध्या कुणालाही भेटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. भारतातही कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्यातही या रोगाने शिरकाव केलेला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने आणि जीवघेणा असल्याने संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही राळेगणसिद्धी परिवाराने हा निर्णय घेतला आहे. हा रोग आटोक्यात येत नाही तोपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येऊ नये. आजपर्यंत राळेगणसिद्धी येथे १६ लाखापेक्षा जास्त पर्यटक राज्य व देश-विदेशातून आलेले आहेत. विशेषत: अण्णा हजारे यांच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्याची पर्यटकांची अपेक्षा असते. कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीत संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे गाव, परिसर, राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी कोरोना रोगाची सुधारणा होईपर्यंत राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे, अशी प्रेमाची विनंती  राळेगणसिध्दी परिवाराने केली आहे. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी कोरोनाला न घाबरता धैर्याने तोंड देण्यासाठी जे जे पथ्य सांभाळावे लागतात ते सांभाळावे. म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोनाanna hazareअण्णा हजारेralegaon-acराळेगाव