शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

करंजीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन किराणा दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 3:02 PM

करंजी येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. करंजी सोसायटीच्या किराणा दुकानासह आणखी एका किराणा दुकानातून रोख रक्कम व चिल्लर लांबविली.

करंजी : येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. करंजी सोसायटीच्या किराणा दुकानासह आणखी एका किराणा दुकानातून रोख रक्कम व चिल्लर लांबविली. चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान चोरट्यांनी जाताना सीसीटिव्ही कॅमे-याची मोडतोड केली. जैन स्थानकातही चोरीचा प्रयत्न केला.  मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ अज्ञात चोरट्यांंनी गावात अक्षरश: धुमाकूळ घातला. सुरूवातीस गावातील अनेक घरांना बाहेरुन धक्के देवून चाचपणी केली. चोरट्यांनी शेतकºयांची कामधेनू असलेल्या करंजी विविध कार्यकारी सोसायटीच्या किराणा दुकानाच्या शटरची पट्टी तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात काउंटरची उचका-पाचक करून दुकानातील रोख रक्कम १० हजार रुपये रोख व चिल्लर असा ऐवज लांबविला. सोसायटीत सिसीटिव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी गजाच्या सहाय्याने कॅमे-यांची तोडफोड केली. त्यानंतर चोरट्यांनी तेथून जवळच असलेल्या सुभाष नामदेव साखरे यांच्या भरवस्तीतील किराणा दुकान फोडले. या दुकानातून रोख रक्कम व चिल्लर लांबविली. भरपेठेत असलेल्या जैन स्थानकाचा दरवाजा उघडून चोरट्यांनी तेथेही चोरीचा प्रयत्न केला. परंतू तेथे फक्त भांडेच असल्याने त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांनी श्वास पथकालाही पाचारण केले होते. करंजी ग्रामस्थ संतप्त  करंजी सोसायटीच्या किराणा दुकानात चोरी झाल्याचे समजताच ग्रामस्थ बुधवारी सकाळी सोसायटीपुढे जमा झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. करंजी येथील औटपोस्ट शोभेची वास्तू झाली आहे. अनेक दिवसापासून नागरिकांनी मागणी करुनही येथे कायमस्वरूपी पोलिसांनी नेमणूक होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. उत्तरेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे, सहायक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे, सरपंच बाळासाहेब अकोलकर, संस्थेचे अध्यक्ष बंडू अकोलकर, रफिक शेख, विजय अकोलकर, सुभाषराव अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, सचिव सुभाष अकोलकरसह मोठया संख्येने ग्रामस्थ हजर होते. याबाबत पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.   करंजीत झालेल्या धाडसी चो-यांचा तपास पोलीस लवकरच लावतील. नागरिकांनी पोलिसांना माहिती देवून सहकार्य करावे, असे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे यांनी सांगितले. 

टॅग्स :Pathardiपाथर्डीtheftचोरी