जिल्ह्यात तीन हजार रेशनकार्डधारकांनी बदलले दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:38+5:302020-12-22T04:19:38+5:30

एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यानंतर आधीचे रेशनकार्ड रद्द करून ते नव्या ठिकाणी काढावे लागते. मात्र ते रेशनकार्ड रद्द करून ...

Three thousand ration card holders changed shops in the district | जिल्ह्यात तीन हजार रेशनकार्डधारकांनी बदलले दुकान

जिल्ह्यात तीन हजार रेशनकार्डधारकांनी बदलले दुकान

Next

एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यानंतर आधीचे रेशनकार्ड रद्द करून ते नव्या ठिकाणी काढावे लागते. मात्र ते रेशनकार्ड रद्द करून ते नव्या ठिकाणी काढावे लागते. मात्र रेशनकार्ड न बदलता दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यात ते कार्यरत रहावे यासाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली एकीकृत वितरण व्यवस्थेअंतर्गत ही नवी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर केल्यास या योजनेचा रेशनकार्ड धारकांना लाभ घेता येतो.

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून गरिबांसाठी सवलतीच्या दरात किंवा मोफत धान्य दिले जाते. ज्या परिसरात वास्तव्य आहे, अशाच भागातील स्वस्त धान्य दुकानातून आतापर्यंत धान्याची उचल करावी लागत होती. आधार क्रमांकावर आधारीत धान्य देण्याची प्रणाली सुरू करून पोर्टबिलीटीची सोय करण्यात आली. त्यानुसार आता रेशनकार्डधारकाला कोणत्याही ठिकाणाहुन धान्य घेण्याची सोय उपलब्ध झाली. या प्रयोगाची नगर जिल्ह्यातही यशस्वी अंमलबजावणी झाली.

-------------

जिल्ह्यात तीन हजार रेशनकार्डधारकांनी पोर्टबिलीटी योजनेचा लाभ घेतला. गाव, जिल्हा. राज्य बदलणाऱ्यांना आता रेशनकार्ड बदलण्याची गरज पडणार नाही. या योजनेचा सर्वाधिक लाभ नेवासा तालुक्यातील रेशनकार्डधारकांनी घेतला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील रेशनकार्डधारकांनी या योजेनचा लाभ घेतला हे विशेष आहे.

-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी

--------------

एकूण रेशनकार्डधारक- ६,९३, ४५५

पोर्टबिलीटीचा लाभ घेतलेले-२९९०

-------------------

तालुकानिहाय पोर्टबिलीटीचा लाभ घेणारे

अहमदनगर-८७, पाथर्डी-२३२, शेवगाव-२९, पारनेर-१३३, कर्जत-१७१, जामखेड-१०१, श्रीगोंदा -२५८, संगमनेर-१०५, कोपरगाव-७६, अकोले-९२, श्रीरामपूर-४०८, नेवासा-६२६, राहाता-२२५, राहुरी-९१, नगर शहर-३५६, एकूण-२९९०

-----------

तक्रारी झाल्या कमी

स्वस्त धान्य दुकानदारांबाबतच्या तक्रारी आता कमी झाल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदार हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या जवळचे असतात. त्यामुळे धान्य दिले जात नाही, भ्रष्टाचार झाला आहे, कमी धान्य दिले जाते अशा स्वरुपाच्या तक्रारी येतात. मात्र त्याचे लगेच निरसन केले जाते. सध्या अशा तक्रारींचेही प्रमाण कमी झाल्या आहेत. ज्या दुकानांबाबत तक्रारी आहेत, अशा दुकानांची संख्या खूपच कमी असून त्याची चौकशी सुरू आहे.

----------

डमी-नेटफोटोत- २१ रेशनकार्ड पोर्टबिलीटी

फोटो- २१ रेशनकार्ड

Web Title: Three thousand ration card holders changed shops in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.