शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

महिला सरपंचासह ग्रामसेवकास जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:04 PM

अहमदनगर : नगर तालुक्यातील सारोळा कासारच्या सरपंच आरती रवींद्र कडूस आणि ग्रामसेवक टी.के.जाधव यांच्यासह इतरांना ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१३)दुपारी घडला. याप्रकरणी सदस्य नामदेव नाथा काळे याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सारोळा कासार ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीतून ...

ठळक मुद्देनगर तालुक्यातील सारोळा कासार येथील प्रकार ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर : नगर तालुक्यातील सारोळा कासारच्या सरपंच आरती रवींद्र कडूस आणि ग्रामसेवक टी.के.जाधव यांच्यासह इतरांना ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१३)दुपारी घडला. याप्रकरणी सदस्य नामदेव नाथा काळे याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सारोळा कासार ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीतून काळे मळा जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. कार्यक्रम सुरु असताना ग्रामपंचायतसदस्य नामदेव काळे तेथे आले व तुम्ही कोणाला विचारून काम सुरु केले मी काम होऊ देणार नाही असे म्हणत ठेकेदाराला दमबाजी करून काम बंद पाडले. सरपंच कडूस यांनी काळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता कडूस यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. उपस्थित ग्रामसेवक इतर सदस्यांनीही काळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कुणाचेही न ऐकता ठेकेदार व त्याच्या कर्मचा-यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत काम बंद पाडले.याप्रकरणी सरपंच आरती कडूस यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फियार्दी वरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrimeगुन्हा