विधानसभेसाठी १८ हजार मतदान यंत्रे शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:58 PM2019-08-13T14:58:00+5:302019-08-13T14:59:00+5:30

राज्यात आॅक्टोबरमध्ये विधासभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी तामिळनाडू राज्यातून १८ हजार मतदान यंत्रे नगरमध्ये दाखल झाली आहेत.

Thousands of voting machines were registered in the city for the assembly | विधानसभेसाठी १८ हजार मतदान यंत्रे शहरात दाखल

विधानसभेसाठी १८ हजार मतदान यंत्रे शहरात दाखल

Next

अहमदनगर : राज्यात आॅक्टोबरमध्ये विधासभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी तामिळनाडू राज्यातून १८ हजार मतदान यंत्रे नगरमध्ये दाखल झाली आहेत. ही सर्व यंत्रे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात उतरविण्यात आली आहेत.
आॅक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून मतदान यंत्रांची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेली मतदानयंत्रे नगरमध्येच असली तरी ती यंत्रे विधानसभेला वापरली जाणार नाहीत. त्यामुळे विधानसभेसाठी तामिळनाडू राज्यातील मतदानयंत्रे मागवण्यात आली आहेत. विधानसभेसाठी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे ७ हजार बॅलेट युनिट, ५ हजार २३० कंट्रोल युनिट, तर ५ हजार ४५० व्हीव्हीपॅट आदी सुमारे १८ हजार यंत्रे लागणार आहेत. ही यंत्रे तामिळनाडू राज्यातील वेल्लोर जिल्ह्यातून घेऊन येण्याचे आदेश केंद्रीय आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी उदय किसवे, पुनर्वसन विभागाचे तहसीलदार महेश शेलार या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांची दोन पथके ही यंत्रे आणण्यासाठी गेली होती.
हे अधिकारी रविवारी (दि. ११) ही सर्व यंत्रे घेऊन पोलीस बंदोबस्तात नगरला दाखल झाले. आता ही यंत्रे एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली गेली आहेत.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गोदामाला भेट देऊन पाहणी केली. लवकरच या मतदानयंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी केली जाणार आहे.

जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मतदान केंद्र आहेत. त्याच्या दुप्पट मतदान यंत्र प्रशासनाने मागवले आहेत. एका बॅलेट युनिटवर नोटा व १५ उमेदवारांची नावे समाविष्ट होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिले तर एका केंद्रावर दोन बॅलेट युनिट लावावे लागतात. त्यामुळेच प्रशासनाने ही जादा यंत्रे मागवली आहेत.

Web Title: Thousands of voting machines were registered in the city for the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.