मेहेरबाबांच्या समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

By अरुण वाघमोडे | Published: July 10, 2023 06:40 PM2023-07-10T18:40:08+5:302023-07-10T18:40:16+5:30

नगर शहराजवळील अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीस्थळी सोमवारी (दि.१०) मौन दिन पाळण्यात आला.

Thousands of Meher lovers observed silence at Meher Baba's tomb | मेहेरबाबांच्या समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

मेहेरबाबांच्या समाधीस्थळी हजारो मेहेरप्रेमींनी पाळले मौन

googlenewsNext

अहमदनगर: नगर शहराजवळील अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीस्थळी सोमवारी
(दि.१०) मौन दिन पाळण्यात आला. यावेळी जगभरातील हजारो भाविक उपस्थित होते. भाविकांनी दिवसभर बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तरी सर्वत्र शांतता होती. अवतार मेहेरबाबानी १० जुलै १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले होते.

यानिमित्त आजच्या दिवशी बाबांचे जगभरातील भक्त मौन दिवस पाळतात. आरणगाव येथे आज समाधीस्थळ सकाळी  ६ वाजता. दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. दररोजची सकाळ व संध्याकाळची आरती आज करण्यात आली नाही. मेहेरबाबाची झोपडी दर्शनासाठी उघडण्यात आली होती. मौन दिनानिमित्त भारतासह जगभरातून मेहेरप्रेमी आले होते. यावेळी सर्वत्र शांतता होती. मेहेरबाबांनी ३ वेळा मौन पाळले होते परंतु १० जुलै, १९२५ रोजीची सुरु केलेले मौन त्यांनी
आयुष्यभर पाळले व एक शब्द कधीही उच्चारला नाही, ते ३१ जानेवारी १९६९ पर्यंत ४४ वर्षांपर्यंत बोलले नाहीत.

Web Title: Thousands of Meher lovers observed silence at Meher Baba's tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.