आयुक्तांशी चर्चा झाली तरी भाजीपाला विक्रेत्यांना महापालिकेचा त्रास;विक्रेत्यांची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:19 PM2020-09-14T13:19:08+5:302020-09-14T13:20:26+5:30

अहमदनगर : येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गत आठवड्यात महापालिकेने हटवले होते.  त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या दरबारात आपली कैफीयत मांडत संरक्षण देण्याची मागणी केली.

Though discussions were held with the Commissioner, the Municipal Corporation was harassing the vegetable sellers; Vendors run to MLA Sangram Jagtap | आयुक्तांशी चर्चा झाली तरी भाजीपाला विक्रेत्यांना महापालिकेचा त्रास;विक्रेत्यांची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे धाव

आयुक्तांशी चर्चा झाली तरी भाजीपाला विक्रेत्यांना महापालिकेचा त्रास;विक्रेत्यांची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे धाव

Next

अहमदनगर : येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गत आठवड्यात महापालिकेने हटवले होते.  त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या दरबारात आपली कैफीयत मांडत संरक्षण देण्याची मागणी केली.

प्रोफेसर चौकातील एका दुकानदाराचे व विक्रेत्याचे भांडण झाले. याचे निमित्त करून महापालिकेने सर्वच विक्रेत्यांना हटवले. तब्बल चार दिवस विक्रीसाठी आणलेली भाजी विक्रेत्यांना तशीच परत न्यावी लागली. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला..

याबाबत आयुक्तांशी चर्चाही केली. त्यानंतर आता महापालिका तुम्हाला हटवणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. परंतु चौकात बसू नका, नाही तर भाजीपाला जप्त करण्याबाबत विक्रेत्यांच्या मागे महापालिकेचा रोजच ससेमिरा सूरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या विक्रेत्यांनी सोमवारी दुपारी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित खामकर यांच्या माध्यमातून  20 भाजी विक्रेत्यांनी आमदार जगताप यांची भेट घेतली.

आमदार स्वतः विक्रेत्यांना रेषा आखून देणार

आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः विक्रेत्यांशी चर्चा केली. बुधवारी सकाळी आपण स्वतः महापालिकेच्या अधिका-यांच्या उपस्थितीत रेषा आखून त्यांना व्यवस्थित जागेवर बसवण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही आमदार जगताप यांनी दिली.

Web Title: Though discussions were held with the Commissioner, the Municipal Corporation was harassing the vegetable sellers; Vendors run to MLA Sangram Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.