तृतीय पंथियांचा अहमदनगर महापालिकेवर मोर्चा        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:39 PM2020-03-02T18:39:31+5:302020-03-02T18:40:21+5:30

 अहमदनगर : शहरातील थकीत कर वसुली तृतीय पंथीयांमार्फत करण्याची घोषणा महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली. तृतीय पंथीयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे महापालिका उपायुक्त सुनील पवार यांनी चूक झाल्याची कबुली देत सोमवारी माफी मागितली. विविध प्रश्न मार्गी लावण्याची प्रशासनाने तयारी दर्शविल्याने तृतीय पंथीयांनी समाधान व्यक्त केले.

Third party marches on Ahmednagar Municipal Corporation | तृतीय पंथियांचा अहमदनगर महापालिकेवर मोर्चा        

तृतीय पंथियांचा अहमदनगर महापालिकेवर मोर्चा        

googlenewsNext

 अहमदनगर : शहरातील थकीत कर वसुली तृतीय पंथीयांमार्फत करण्याची घोषणा महापालिकेच्या चांगलीच अंगलट आली. तृतीय पंथीयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे महापालिका उपायुक्त सुनील पवार यांनी चूक  झाल्याची कबुली देत सोमवारी माफी मागितली. विविध प्रश्न मार्गी लावण्याची प्रशासनाने तयारी दर्शविल्याने तृतीय पंथीयांनी समाधान व्यक्त केले.
महापालिकेच्या कर वसुलीच्या आढावा बैठकीत तृतीय पंथीयांमार्फत थकीत कर वसूल करण्याचा निर्णय झाला होता. महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांच्या स्वाक्षरीने तसे पत्रक  जारी करण्यात आले. माध्यमांनाही याची माहिती देण्यात आली. महापालिकेच्या या पत्रकावर तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा काजल गुरु बाबू नायक नगरवाले यांनी आक्षेप घेतला. महापालिकेने तृतीय पंथीयांशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही. कर वसुली करण्याचा निर्णय महापालिकेने परस्पर घेतलाच कसा? यामुळे बदनामी झाल्याचा आरोप काजल गुरू यांनी केला.
व्यथाही मांडल्या
आंदोलनादरम्यान काजल गुरू यांनी तृतीय पंथीयांच्या व्यथा मांडल्या. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. स्मशानभूमीला जागा मिळत नाही. मतदान ओळखपत्र मिळते पण, आधार नोंदणी करून घेतली जात नाही. आधार नोंदणीसाठी पाठपुरावा करू. तसेच तृतीय पंथीयांना महापालिकेत नोकरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही उपायुक्त पवार यांनी दिले.

Web Title: Third party marches on Ahmednagar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.