शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

वरुडी फाटा येथे चोरट्यांनी सात दुकाने फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:46 AM

संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे सात दुकाने फोडली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.  दरम्यान, तीन ते चार चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. चोरट्यांनी किती ऐवज चोरुन नेला हे मात्र समजू शकले नाही. 

घारगाव : संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे सात दुकाने फोडली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.  दरम्यान, तीन ते चार चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. चोरट्यांनी किती ऐवज चोरुन नेला हे मात्र समजू शकले नाही. नाशिक-पुणे महामार्गावर वरुडी फाटा येथे दुकानांचे शटर वाकून चोरट्यांनी आत प्रवेश करीत रोख रकमेसह ऐवज लांबविला. यात गोविंद कलेक्शन, मातोश्री कृषी सेवा केंद्र, श्रावणी ब्युटी पार्लर, शिवम ट्रेडर्स, अमेरिया मेडिकल, प्रशांत मोबाईल शॉपी, साईश्रध्दा कॉम्प्युटर्स यांच्यासह अन्य दुकानांचा समावेश आहे. विशेषत: ही सर्व दुकाने एकमेकांना लागून आहेत. या भागात मोठी वर्दळ असते. चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास दरम्यान दुकाने फोडली असावीत. या चोरट्यांकडे शटर वाकविण्यासाठी व कुलपे तोडण्यासाठीही चांगलेच साहित्य होते.  दोन दिवसांपूर्वी याच परिसरातून मंगेश फटांगरे यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.-१७, बी.डब्लू.५७१७) चोरीला गेली आहे. माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासह पोलीस नाईक संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :theftचोरीSangamnerसंगमनेर