नदीपात्रात पडून पुराच्या पाण्यात पिकअप वाहून गेली; चालकासह अजूनही दोघं असल्याचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 02:58 PM2022-08-16T14:58:51+5:302022-08-16T14:59:08+5:30

नाशिक येथून काचा घेऊन निघालेली पिकअप संगमनेर तालुक्यातील ओझर येथे काचा घेऊन आली होती.

The pickup fell into a riverbed and was swept away by floodwaters; Both are believed to be still there, including the driver in sangamner | नदीपात्रात पडून पुराच्या पाण्यात पिकअप वाहून गेली; चालकासह अजूनही दोघं असल्याचा अंदाज 

नदीपात्रात पडून पुराच्या पाण्यात पिकअप वाहून गेली; चालकासह अजूनही दोघं असल्याचा अंदाज 

Next

संगमनेर (जि. अहमदनगर): मालवाहतूक करणारी पिकअप पुलावरून नदीपात्रात पडून पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही घटना सोमवारी ( दि.१५) रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि पिंपरणे या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर घडली. पुलाला कुठल्याही प्रकारचे संरक्षक कठडे नव्हते. 
  
नाशिक येथून काचा घेऊन निघालेली पिकअप संगमनेर तालुक्यातील ओझर येथे काचा घेऊन आली होती. काचा खाली करून जात असताना पुलावरून नदीपात्रात पडून पिकअप पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यात चालकासह अजूनही दोघे जण असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. सकाळी पुलावरील गज तुटलेले दिसले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, तलाठी संग्राम देशमुख, सहायक फौजदार लक्ष्मण औटी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले हे घटनास्थळी पोहोचले आहेत.

Web Title: The pickup fell into a riverbed and was swept away by floodwaters; Both are believed to be still there, including the driver in sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.