शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

लोकसहभागातून उभारले ४० लाखाचे ज्ञानमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 11:33 AM

पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे लोकसहभाग, तरुणाईचे प्रयत्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन यातून जवळपास ४० लाख रूपये खर्चून शाळेची इमारत (ज्ञान मंदिर) उभारली आहे. ही इमारत अवघ्या सहा महिन्यात उभी राहिली.

शिवाजी पानमंद सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे लोकसहभाग, तरुणाईचे प्रयत्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन यातून जवळपास ४० लाख रूपये खर्चून शाळेची इमारत (ज्ञान मंदिर) उभारली आहे. ही इमारत अवघ्या सहा महिन्यात उभी राहिली. त्याचबरोबर इ-लर्निंगसह डिजीटल क्लासरूमचा शिक्षकदिनी आरंभ करण्यात आला.शहरातील मुलांप्रमाणे आपल्यालाही आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळणार असल्याने पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बाळानंद स्वामी विद्यालय पूर्वी असणाºया संस्था चालकाने जानेवारी २०१७ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले होते. इतरत्र शाळेसाठी जावे लागणार, खर्च वाढणार, मुलींच्या शाळेचे काय? असे प्रश्न होते. गावातील कारभारी मंडळी व युवा सरपंच संदीप मगर, जयसिंग मगर, संतोष पवार, बाबासाहेब मगर, शत्रुघ्न मगर, प्रा. राम मगर आदी मंडळींनी विद्यालय गावाने चालवण्यासाठी घेण्याचा निर्णय घेतला.गावात उपलब्ध होईल तेथे वर्ग भरवून शाळा सुरू ठेवली. तरुणाई सरपंच मगर यांच्या पाठीशी उभी राहिली. इमारत बांधकाम सुरू केल्यावर बांधकाम साहित्य, रोख मदतीचा ओघ सुरू झाला. या कामी मुख्याध्यापक नारायण साठे, राजेंद्र गोडसे यांनीही सहभाग घेतला. अवघ्या सहा महिन्यात गावकºयांनी लोकसहभागातून इमारत उभारली. सुपा एमआयडीसीतील  कारखानदारांना भेटून त्यांच्याकडून डिजिटलशाळा करण्यासाठी निधी मिळवला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘मायडिया’चे प्रॉडक्शन मॅनेजर निलेश ढगे, ‘ओम्नी अ‍ॅक्टिव्ह’चे मुख्य अधिकारी महिपाल संचेती यांच्या हस्ते डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन झाले. 

टॅग्स :Schoolशाळाdigitalडिजिटल