शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

मृतदेह रस्त्यावर ठेऊन संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; पादचारी महिला अपघातात ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 5:18 PM

अरणगाव बायपासवरील नाटमळा परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

केडगाव : अरणगाव बायपासवरील नाटमळा परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना समजल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.इंदूबाई सखाराम शिंदे (वय ७२, रा. अरणगाव, ता. नगर) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. नाटमळा परिसरातील इंदूबाई शिंदे ही महिला पहाटे सहावा वाजता फिरायला गेली होती. रस्ता ओलांडत असताना सोनेवाडीकडून वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने महिलेला धडक दिली. महिलेचा जागीच मृत्यू झाला. बायपासवर यापूर्वी खड्डे असल्याने अपघात होत होते. आता रस्त्याची दुरुस्ती झाल्याने वाहने वेगात जातात. नाटमळा परिसरात स्पीडब्रेकर बसविण्याची ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली होती. मात्र बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. अखेर येथे महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेऊन रास्ता रोको आंदोलन केले. काही वेळातच पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी गावक-यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावक-यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातStrikeसंप