शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

पोखरी बाळेश्वर तलावातून पाणी चोरी; दहा जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 5:59 PM

पोखरी बाळेश्वर गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा तलावातून अनधिकृतपणे शेतीपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा तलावातून अनधिकृतपणे शेतीपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे  ग्रामपंचायतीच्या मालकीचा सार्वजनिक पाणी पुरवठा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. या तलावात येथील काही ग्रामस्थ १० आॅगस्ट २०१९ पासून अनधिकृतपणे विद्युतपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा करत होते. हा अनधिकृत पाणी उपसा बंद करावा अशा वेळोवेळी ग्रामसेवकांनी नोटिसा बजाविल्या होत्या. मात्र त्यांनी दखल न घेतल्याने ग्रामसभेत त्यांच्याविरुद्ध सर्वानुमते ठराव झाला. ग्रामविकास अधिकारी आतीफ फाहीम शेख (वय-२१, रा. शिवाजीनगर,ता.संगमनेर ) यांनी  घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी देवराम अहिलाजी काळे, प्रभाकर महादू फटांगरे, मुरलीधर लहानु खरात, रवींद्र दादा खरात, बाजीराव सूर्यभान फटांगरे, शिवाजी सखाहारी फटांगरे, सूर्यभान सयाजी फटांगरे, संपत धोडींबा फटांगरे, बाळकिसन नामदेव फटांगरे, शांताराम अमृता फटांगरे (सर्व रा. पोखरी बाळेश्वर ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, पोलीस कॉन्स्टेबल सुनील रत्नपारखी करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीtheftचोरीSangamnerसंगमनेर