शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

कर्जतमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेस शानदार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 9:13 PM

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस कर्जत येथील गोदड महाराज क्रीडानगरीत गुरुवारी शानदार प्रारंभ झाला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यांनी ज्योत प्रज्वलीत करुन उद्घाटन केले.

ठळक मुद्देकबड्डीचा थरार राज्यातील ३२ संघाचा सहभाग

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस कर्जत येथील गोदड महाराज क्रीडानगरीत गुरुवारी शानदार प्रारंभ झाला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यांनी ज्योत प्रज्वलीत करुन उद्घाटन केले. यावेळी आमदार भीमराव धोंडे उपस्थित होते. राज्य शासनाचा क्रीडा व युवक कल्याण विभाग, राज्य कबड्डी असोसिएशन, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.

उदघाटन समारंभावेळी सहभागी खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन केले. नायगावच्या ढोलपथककांनी ढोलवादन सादर केले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी १६ संघांचे साडेतीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सुरुवातीला फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये पालकमंत्री शिंदे विराजमान झाले होते. त्यानंतर शहराचे प्रथम नागरिक नामदेव राऊत आणि इतर मान्यवर सजवलेल्या ट्रौलीमध्ये सहभागी झाले. विविध वेशभूषेत असलेली शालेय मुले, त्यानंतर महिलांचे ढोल-ताशा पथकाने वेधून घेतले. लेझीम पथकांच्या तालावर कर्जतकरांनी ताल धरला. पोलीसांच्या बैन्डने वातावरणात नवा जोष संचारला. शहराच्या विविध भागातून हे संचलन होत असताना शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. श्री सदगुरु गोदड महाराज क्रीडानगरी अक्षरश: क्रीडाप्रेमींनी फुलून गेली. सायंकाळी प्रकाश झोतात सामने होणार असले तरी दुपारपासूनच क्रीडाप्रेमींची पावले स्पर्धास्थळाकडे वळत होती. संपूर्ण प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली होती.यावेळी आमदार भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, सभापती पुष्पाताई शेळके, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी दत्ताभाऊ पाथ्रीकर, संभाजीराव पाटील, बाबूराव चांदेरे, पुंडलीक शेजवळ, सुनील जाधव, राजेंद्र फाळके, शांताराम जाधव, मोहन भावसार, विजय पाथ्रीकर, रमेश भेंडगिरी, भारत गाढवे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, आस्वाद पाटील, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, राजेंद्र फाळके, शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठानचे सुभाष तनपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, प्रसाद ढोकरीकर, अशोक खेडकर, क्रीडा अधिकारी खुरंगे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्र्याकडून विजेत्या संघास १ लाख ११ हजार तर उपविजेत्यास ५१ हजार रुपयेसरकारच्या वतीने विजेत्या संघास रोख पुरस्कार दिले जातात मात्र स्थानिक आमंदारांनीही रोख पुरस्कार द्यावे, अशी इच्छा आमदार भिमराव धोंडे यांनी व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री शिंदे यांनी केली. आगामी कालावधीत कर्जत तालुक्याचा खेळाडू राज्याचे आणि देशाचे नेत्रूत्व करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा विकासाला वेग देणारी व युवा खेळाडूंसाठी ही प्रोत्साहन देणारी स्पर्धा ठरणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतKabaddiकबड्डी