राज्य सरकारने खाजगी रुग्णालयात मोफत उपचार सुरू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:20 AM2021-05-09T04:20:44+5:302021-05-09T04:20:44+5:30

कोपरगाव : आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या राज्यात सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयातही कोविड रुग्णांवर मोफत ...

The state government should start free treatment in private hospitals | राज्य सरकारने खाजगी रुग्णालयात मोफत उपचार सुरू करावेत

राज्य सरकारने खाजगी रुग्णालयात मोफत उपचार सुरू करावेत

Next

कोपरगाव : आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या राज्यात सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयातही कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांचे प्राण यामुळे वाचणार आहेत. आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारनेही आपल्या राज्यात कोरोना रुग्णांसाठी सरकारी दवाखान्यात सोबत खाजगी दवाखान्यातही कोरोना रुग्णांसाठी मोफत देण्याची योजना राबवावी, अशी मागणी शिवसेना नेते नितीन औताडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

औताडे म्हणाले, आर्थिक अडचणीमुळे पैशाअभावी अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर काही रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. बेड उपलब्ध झाले तर रेमडेसिवर इंजेक्शन मिळत नाही. या इंजेक्शनचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा सगळ्या दुष्टचक्रात जनता सापडली आहे. वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेला रोजगार नाही, व्यवसाय बंद, उद्योगधंदे बंद हाताला काम नाही. त्यामुळे एखाद्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर अशा कुटुंबाची मोठी धावपळ होते. नातेवाइकांकडून पैसे उपलब्ध करून सोने गहाण ठेवून रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र समोर येत आहे. कोरोनाच्या नावाखाली अनेक खाजगी डॉक्टरांनी संकटकाळामध्ये कोविड सेंटर उघडून आर्थिक लूट चालवली आहे.

Web Title: The state government should start free treatment in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.