'...म्हणून आम्ही नरेंद्र मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला'; अजित पवारांनी थेट मंचावर सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:57 PM2023-10-26T17:57:39+5:302023-10-26T18:08:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले.

State Chief Minister Ajit Pawar today praised Prime Minister Narendra Modi | '...म्हणून आम्ही नरेंद्र मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला'; अजित पवारांनी थेट मंचावर सांगितले!

'...म्हणून आम्ही नरेंद्र मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला'; अजित पवारांनी थेट मंचावर सांगितले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदनगरमधील विविध विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनीनरेंद्र मोदींचे कौतुक केले. 

गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितल्यास ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत असल्याचं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती. त्याच भूमिकेतून आज नरेंद्र मोदी हे राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. याच कारणामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवारांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर कायम राजकारण केले आहे. राज्यातील एक वरिष्ठ नेते केंद्रात कित्येक वर्ष कृषी मंत्री होते. व्यक्तिगत मी त्यांचा सन्मान करतो पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर हल्लाबोल केला. मागील ९ वर्षात ७० हजार कोटींचे इथेनॉल खरेदी केले. ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी कारखान्यांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी मदत केली असं त्यांनी सांगितले.

आम्ही विकासाचे आकडे सांगतो, २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराचे आकडे होते

देशाला गरिबीपासून मुक्ती मिळेल, गरिबीला पुढे जाण्याची संधी मिळेल हाच सामाजिक न्याय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारचे बजेटही वाढतेय. महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्यमान कार्ड दिलेत. या सर्व कार्डधारकांना ५ लाख रुपयांच्या मोफत उपचाराची हमी आहे. गरिबांना मोफत रेशनसाठी ४ लाख कोटींहून अधिक खर्च केलेत. गरिबांना घरे दिलीत. २०१४ च्या आधीच्या १० वर्षाच्या तुलनेत जास्त आहेत. नल ते जल योजनेत आतापर्यंत २ लाख कोटी खर्च झालेत. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कुटुंबांना मिळत आहे. मी इतके आकडे सांगतोय, २०१४ च्याआधीही तुम्ही आकडे ऐकत होता, पण किती लाख कोटींचा भ्रष्टाचार, घोटाळा हे होते. आता इतके लाख कोटींची विकासकामे, योजना असं आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

२०२४मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताला यशाचा परिस आहे. म्हणून त्यांना विकास कामांच्या निमित्ताने महाराष्ट्रात बोलवत असतो. परंतु, काहींच्या पोटात दुखते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. देशात सन २०१९मध्ये सर्वजण एकत्र आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही एकत्र येत असले तरी एकही मोदी सबको भारी, असेही शिंदे यावेळी म्हणाले. 

Web Title: State Chief Minister Ajit Pawar today praised Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.