शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अकोलेतील सर्व प्रश्न सोडविणार-वैभव पिचड; पठार भागात दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:51 PM

मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.  सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. 

अकोले : मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.  सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील पठारभागाच्या दौ-यावर महायुतीचे उमेदवार वैभव पिचड हे बुधवारी आले होते. त्यावेळी बोटा गावातील सभेमध्ये ते बोलत होते. जनार्दन आहेर, सुरेखा गव्हाणे, अशोक इथापे, मीनानाथ पांडे, अरूण इथापे,  बबन गागरे, उत्तम ढेरंगे, संतोष शेळके,  दिलीप साळगट,  विलास शेळके, नितीन आहेर उपस्थित होते.पिचड म्हणाले, पाच वर्षे विरोधात असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम केले. वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलनही केले. मात्र आपले सरकार नसल्याने मतदार संघातील रस्त्यांची कामे, पाटपाण्याचे प्रश्न सोडवता आले नाही. तरीही आपण आपल्या आमदार निधीतून थोडा-थोडा निधी देण्याचे काम केले आहे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पिचडांनी पस्तीस वर्ष काय केले ? असे प्रतिस्पर्धी उमेद्वार सांगतात. माजी मंत्री पिचड यांनी पठारभागाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. याभागातील सर्व सामान्य शेतकरी सुजलाम सफलाम झाला आहे. पाच वर्षात महायुतीच्या सरकारवर कुठलाच भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.शिवाजी तळेकर म्हणाले, अकलापूर गावच्या विकासासाठी पिचड यांनी भरभरून निधी दिला. त्यामुळे आज  त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. अशोक वाघ म्हणाले, पिचड यांनी पठारभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता  त्यांच्या पाठीशी आहे. यावेळी उत्तम ढेरंगे, अशोक इथापे, दिलीप साळगट, बाळासाहेब ढोले, अरूण इथापे, गणेश यांची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019