Six injured in jeep-tempo accident on Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्गावर जीप-टेम्पो अपघातात सहा जखमी

नाशिक-पुणे महामार्गावर जीप-टेम्पो अपघातात सहा जखमी

घारगाव : चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात जीपमधून प्रवास करणारे सहा जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. २३) सकाळी आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा फाटा येथे घडला.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीपमधून (एम. एच.-१६, ए.जी.-६८९२) प्रवास करणारे नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने जात असताना संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने पुढे असलेल्या टेम्पोला (एम.एच.-१२, एन. एक्स.-१२५८) या जीपची पाठीमागून धडक बसली.

    या अपघातात जीपचालक अभिजीत चंद्रसेन आहेर यांच्यासह मयुर विजय बागूल, तेजस कैलास आहेर, एकनाथ भाऊसाहेब आहेर, प्रीतम बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब रामनाथ आहेर (सर्व रा. लोणी, ता. राहाता) हे जखमी झाले. या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले.

 

Web Title: Six injured in jeep-tempo accident on Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.