शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

जर्मनीत सहाशे एकर जागेत साईआश्रम; दिवसाची सुरूवात साईनामाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 6:36 PM

जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे.

ठळक मुद्देजर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे.जर्मनीतील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे.जर्मनीच्या रिनेक शहरातील श्रीसाई आश्रमाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. मूळचे हैदराबाद येथील असलेले साई रेड्डी चोलेटी यांनी १९९३ मध्ये जर्मनीत साईबाबांच्या नावाने योगा केंद्र सुरू केले.

प्रमोद आहेरशिर्डी : आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे. जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे.धर्म, जात, देश अशी सर्व बंधने तोडून या सर्वांना साईनामाच्या धाग्याने एकत्र जोडले आहे. जर्मनीच्या रिनेक शहरातील श्रीसाई आश्रमाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. मूळचे हैदराबाद येथील असलेले साई रेड्डी चोलेटी यांनी १९९३ मध्ये जर्मनीत साईबाबांच्या नावाने योगा केंद्र सुरू केले. दीडशे केंद्रांच्या रूपाने जर्मनीत देशभर विस्तार झालेल्या या चळवळीत पस्तीस हजार लोक जोडले गेले आहेत. लोकसंख्येने कमी असलेल्या जर्मनीत ही संख्या खूप मोठी आहे. या केंद्रामध्ये साईबाबांची प्रतिमा असते. या प्रतिमेपुढे मेणबत्ती लावून साईनामाचा जप व भजन करण्यात येते. त्यानंतर ध्यानधारणा करण्यात येते. यात अनिवासीय भारतीयांची संख्या अगदी नगण्य असून स्थानिक जर्मन नागरिक अधिक आहेत.जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. तीनशे एकरवर जंगल आहे. येथे आता भव्य साई मंदिराचे निर्माण होत आहे़ यापूर्वी फ्रँकफुर्ट, लाईफसिक व हेस्टलो शहरात साईमंदिरे झाली आहेत. शनिवार, रविवार या मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात.साईरेड्डी गेल्या वीस वर्षांपासून तेथील भाविकांसह वर्षातून दोनदा शिर्डीला भेट देतात. याद्वारे दरवर्षी शिर्डीला किमान साठ ते सत्तर भाविक येतात. अलिकडे तेथून अन्य ग्रुपही शिर्डीला येत आहेत. दोन दिवसांपासून साई रेड्डी वीस भाविकांसह साईदरबारी आले आहेत. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी या सर्वांचे आदरतिथ्य करीत भारतीय पद्धतीने स्वागत केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा