शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

श्रीरामपूर : काँग्रेसच्या होमपिचवरच सेनेच्या लोखंडे यांना मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 6:40 PM

शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला.

शिवाजी पवारश्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. काँग्रेसचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी राधाकृष्ण विखे यांची केलेली साथ तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी झालेली जवळीक या काही ठळक घडामोडी येथे घडल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथे मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे.आमदार कांबळे यांची स्वत:च्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातच मोठी पिछेहाट झाली. तब्बल २१ हजार ४५८ मतांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी येथून आघाडी घेतली. विशेष म्हणजे माजी आमदार भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक हेदेखील कांबळे यांना आघाडी देऊ शकले नाहीत.मतदानाच्या ऐन तोंडावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा करण ससाणे यांनी राजीनामा दिला. त्यांनी समर्थकांसमवेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची साथ केली. श्रीरामपूर शहर व ग्रामीणमध्ये त्यांनी लोखंडे यांच्याकरिता मोर्चा सांभाळला. कांबळे यांना पराभूत करण्याचा विडाच त्यांनी उचलला होता.काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी हा घटनाक्रम घडला. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील प्रचाराचे मुद्देच बदलले गेले. विखे-थोरात लढतीचेच त्याला स्वरुप आले. ससाणे यांनी घेतलेला हा निर्णय सध्या तरी त्यांच्यासाठी फायद्याचाच ठरला. शहरात माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, दिलीप नागरे, मुक्तार शाह, मुजफ्फर शेख, किरण परदेशी, शशांक रासकर, मनोज लबडे, रितेश रोटे, आशिष धनवटे, दिलीप सानप, राजेंद्र सोनवणे, मुन्ना पठाण यांनी मोर्चा सांभाळला. त्यामुळे शहरातूनच लोखंडे यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे कांबळे यांची कोंडी झाली. विखे यांची खेळी निर्णायक ठरली. ग्रामीणमध्येही सभापती सचिन गुजर यांनी काम पाहिले. सध्याच्या स्थितीत नगरपालिकेत करण ससाणे हे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे तुर्तास तरी स्थानिक आघाडी तयार करून ते राजकीय प्रवास सुरू ठेवतील. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षासोबत राहतील. अशा स्थितीत भाजपचे जुने निष्ठावान प्रकाश चित्ते काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. याला कारण म्हणजे विखे हे ससाणे यांनाच ताकद देण्याची शक्यता आहे.काँग्रेस-राष्टÑवादीपुढे सेना-भाजप युतीचे मोठे आव्हानश्रीरामपूर विधानसभेवर या निकालांचा मोठा परिणाम होणार आहे. ससाणे हे सेना-भाजप तर मुरकुटे हे काँग्रेसच्या बाजूने झुकले आहेत. त्यामुळे त्यांच्याच उमेदवारांत लढत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना श्रीरामपुरात अवघी ६ हजार ३९२ मते मिळाली. त्यांनी कपाळमोक्ष करुन घेतला आहे.विद्यमान आमदारभाऊसाहेब कांबळे। काँग्रेस

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी