शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

शिवाजी महाराजांचा अपमान करणा-या छिंदमचं नगरसेवकपद रद्द, ठराव एकमताने मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 3:38 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या भाजपाच्या निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे

अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या भाजपाच्या निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासोबतच छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला आहे. श्रीपाद छिंदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठरावाला सर्वपक्षीय सदस्यांनी महासभेत हात उंचावून पाठिंबा दिला. 

शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपाच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते. यानंतर छिंदम याने माफीही मागितली होती, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. 

नेमकं प्रकरण काय?छिंदमने मनपा बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी काल माणसे का पाठविली नाहीत, याची विचारणा केली होती. शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो, असे बिडवे म्हणाले होते. त्यानंतर शिवाजी महाराज व शिवजय़ंतीबाबत छिंदम यांनी अपशब्द वापरले.बिडवे यांच्याशी बोलताना छिंदम यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले होते. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगीराज गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून छिंदम यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्याचवेळी छिंदम यांचे कार्यालय व घरासमारे शिवसैनिक, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करत गाड्या फोडल्या. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.  उपमहापौर छिंदम यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली होती. खासदार दिलीप गांधी यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली होती.  

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदम