शिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:20 PM2020-03-17T13:20:22+5:302020-03-17T13:21:28+5:30

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी (दि.१७ मार्च) घेतला.  भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक  पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

Shirdi's Sai temple closed; Closed indefinitely from today; The second event in the history of Scientology after 90 years | शिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना

शिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना

Next

शिर्डी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी (दि.१७ मार्च) घेतला.  भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक  पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे.  यापूर्वी १९४१ साली कॉलरामुळे ब्रिटिशांनी रामनवमी उत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद ठेवले होते.  ८९ वर्षापूर्वीच्या निर्णयाची आजच्या निर्णयाने पुनरावृत्ती होत आहे.  ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मंगळवारी दुपारी तीन नंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद करण्यात येईल. शिर्डीत असलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारी प्रसादालय सुरू ठेवण्यात येईल. उद्या नास्ता पाकिटे सुरू राहतील.  भक्तनिवासही उद्या सकाळपर्यंत रिकामी करण्यात येणार आहे. 
या पत्रकार परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ़ आकाश किसवे, रमेश उगले, गमे, औटी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, संरक्षण प्रमुख गंगावणे, आयटी प्रमुख अनिल शिंदे आदी उपस्थीत होते. साथीचा फैलाव टाळण्याच्या दृष्टीकोनातून व भाविकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेवून सामाजिक भान जपत मंदिर पुढील निर्णय होईपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या पंधरा दिवसात जगभरातील ३८ देशांतील ६२६ भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे. यात कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या चीन, इटली व स्पेनसह २१ देशातील २८६ भाविकांचा समावेश आहे. 
गेल्या पंधरा दिवसात चीन (४), इटली (६), फ्रान्स (१), स्पेन (३), नेदरलॅन्ड (४), आॅस्ट्रेलिया (१०), स्विर्त्स्झलॅन्ड (५), युनायटेड किंगडम (३९), युनायटेड स्टेट (१११) मधून आलेल्या विदेशी भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात चीनमधून (६), इटली (५),  फ्रान्स (२), स्पेन (४), आॅस्टेलिया (५१७), युनायटेड किंगडम (१७८), युनायटेड स्टेटस (१६७६), दुबई (१०३), जर्मनी (११५), युयेई (१३०), सिंगापूर (१६१) भाविक शिर्डीत येवून गेले आहेत.  ‘लोकमत’ने मंगळवारी विदेशी भाविकांची शिडीर्तील आकडेवारी समोर आणल्याने परिस्थितीचे गांभिर्य वाढले होते.
....
प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवारचा आठवडेबाजार, मॉल, वॉटरपार्क, साईतीर्थ थीमपार्क, साईहेरीटेज व्हिलेज (जुनी शिर्डी) जीम, बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: Shirdi's Sai temple closed; Closed indefinitely from today; The second event in the history of Scientology after 90 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.