शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शिर्डी मतदारसंघातून लढणार नाही : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 6:45 PM

आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईतून लढविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

अहमदनगर: आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईतून लढविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा चेहरा आणखी व्यापक करण्यासाठी आणि निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत नॉन दलित (दलितेतर) प्रतिनिधांना उमेदवारी देणार आहे. या निवडणुकीत सेना-भाजपाची युती झाली नाही तर लोकसभेच्या चार तर विधानसभेच्या २५ जागा पक्ष मागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या विषयांवरून विरोध टीका करत असले तरी हे दोन्ही निर्णय देशहिताचेच आहेत.  सरकारविरोधात दोन दिवसांपूर्वी देशात पुकारलेल्या भारतबंदला प्रतिसाद मिळाला नाही. केलेली कामे आणि आणि चांगल्या निर्णयाच्या जोरावर केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्यात कुठलाही बदल होणार नाही. हा कायदा दलितांच्या रक्षणासाठी असून सवर्णांना त्रास देण्यासाठी नाही. याचा गैरवापर होत असेल तर मंत्री म्हणून यात लक्ष्य घालणार आहे. दलितांवरील अत्याचारांच्या घटनेबाबत कुणी राजकारण करू नये. आरक्षणाची मर्यादा ७५ टक्यांपर्यंत केली तर मराठा समाजासह रजपूत, जाठ, ठाकूर, धनगर या समाजाला आरक्षण देणे शक्य होणार आहे. फडणवीस सरकार मराठा समाजाच्या बाजुने उभा आहे, असे सांगत आठवले यांनी दलित शब्दाच्या वापरास मनाई करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.आम्ही नक्षलवाद्यांपेक्षा खतरनाकआम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही खतरनाक आहोत. पण पोलीसांनी आम्हाला कधी अटक केली नाही. कारण आम्ही जनहित आणि देशहितासाठी काम करतोत. काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या विचारवंतांविरोधात ते नक्शलवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे असल्याचे पोलीस सांगत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. नक्शलवादी विचारसरणी असणा-यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नये, असे आठवले म्हणाले.पोलीसांनी भिडेंच्या विरोधात पुरावे शोधावेतभीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून कडक कारवाई करावी. भिंडेंचे वक्तव्य जरी तपासले तरी पुरावे मिळतील़ असे आठवले म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवले