शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

शेवगावकर पितात पिवळे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्कशेवगाव : शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून गेल्या दोन दिवसांपासून पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरु आहे़ त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पिवळसर पाणी पिण्याची वेळ आली आहे़ जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीनंतर पुढील दोन दिवसात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे़शेवगाव, पाथर्डी या दोन तालुक्याच्या ...

ठळक मुद्देगोदावरी नदीतून जायकवाडी जलाशयात सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे.योजनेच्या जॅकवेल भोवती शेवाळ तसेच सडलेल्या पाला पाचोळ्याचा थर जमा होतो.याच कारणाने अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सुरु आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कशेवगाव : शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून गेल्या दोन दिवसांपासून पिवळसर दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरु आहे़ त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पिवळसर पाणी पिण्याची वेळ आली आहे़ जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीनंतर पुढील दोन दिवसात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे़शेवगाव, पाथर्डी या दोन तालुक्याच्या गावासह योजनेवरील सर्व ५४ गावात दुर्गंधीयुक्त पिवळसर अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलजन्य आजाराच्या भीतीने जनतेला विकतचे पाणी घ्यावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते अरुण लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मन्सूर फारूकी, नगरसेवक शब्बीर शेख, अजय भारस्कर, भाऊसाहेब कोल्हे, उपअभियंता सानप आदींनी पाणी योजनेच्या शहरातील खंडोबामाळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली़. गोदावरी नदीतून जायकवाडी जलाशयात सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यातून योजनेच्या जॅकवेल भोवती शेवाळ तसेच सडलेल्या पाला पाचोळ्याचा थर जमा होतो. पावसाळ्यात प्रत्येक वर्षी अशुद्ध पाण्याची ओरड होते. यंदाही याच कारणाने अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सुरु आहेत़ पिण्याच्या पाण्याचा उग्र दर्प कमी व्हावा, यासाठी क्लोरीन, टीसीएल, तुरटी आदी रसायनांची मात्रा वाढविण्याच्या तसेच साथींच्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाभार्थी नागरिकांनी तूर्त पाणी उकळून प्यावे, अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.