मला पोलीस संरक्षण नको; कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं स्तुत्य पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:03 PM2020-03-25T16:03:49+5:302020-03-25T16:04:50+5:30

संचारबंदीच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता मृद व जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी स्वत: आपली पोलीस सुरक्षा हटविण्याचे पत्र नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

Security removed by Minister Shankarrao Gadakh; Letter to the Superintendent of Police | मला पोलीस संरक्षण नको; कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं स्तुत्य पाऊल

मला पोलीस संरक्षण नको; कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं स्तुत्य पाऊल

Next

नेवासा : संचारबंदीच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता मृद व जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी स्वत: आपली पोलीस सुरक्षा हटविण्याचे पत्र नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

देश व राज्य कोरोनाचा संकटाचा सामना करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रहितासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे माझ्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनेत वापरण्यास परवानगी देत असल्याचे पत्राद्वारे शंकरराव गडाख यांनी सांगितले आहे. 

कोरोनामुळे सुरक्षा यंत्रणेवरील वाढता ताण पाहता आपण सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेत असल्याचे गडाख यांनी पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Security removed by Minister Shankarrao Gadakh; Letter to the Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.