Second Independence in Wambori; Dominated by former Zilla Parishad President Babasaheb Bhite | वांबोरीत दुस-यांदा सत्तांतर; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांचे वर्चस्व

वांबोरीत दुस-यांदा सत्तांतर; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांचे वर्चस्व

राहुरी : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या वांबोरी ग्रामपंचायतीत  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या गटाने वर्चस्व मिळविले आहे. त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुभाष पाटील गटाचा दुस-यांदा पराभव करुन सत्तांतर घडवून आणले आहे.

गेल्या ४० वषार्पासून वांबोरी ग्रामपंचायतीवर विखे समर्थक ॲड. सुभाष पाटील यांचे वर्चस्व होते. यात फक्त दोन वेळा सत्तांतर घडले. मागील वेळेसही विरोधी गटाचे प्रमुख बाबासाहेब भिटे यांनी ॲड. पाटील गटाचा पराभव करुन ग्रामपंचायतीत सत्ता मिळविली होती. यावेळीही त्यांनी पाटील गटाचा पराभव केला. १७ पैकी भिटे गटाला ११ जागा मिळा्ल्या. तर पाटील गटाला ६ जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही गटांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

Web Title: Second Independence in Wambori; Dominated by former Zilla Parishad President Babasaheb Bhite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.