कासार समाजातील विद्यार्थ्यांना अखेर शिष्यवृती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:21 AM2021-07-27T04:21:26+5:302021-07-27T04:21:26+5:30

कासार समाजातील हुशार विद्यार्थ्यांना दिली जाणारी ही शिष्यवृत्ती अनेक वर्षांपासून बंद पडली होती. अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष शरद ...

Scholarships finally started for students from the Kasar community | कासार समाजातील विद्यार्थ्यांना अखेर शिष्यवृती सुरू

कासार समाजातील विद्यार्थ्यांना अखेर शिष्यवृती सुरू

Next

कासार समाजातील हुशार विद्यार्थ्यांना दिली जाणारी ही शिष्यवृत्ती अनेक वर्षांपासून बंद पडली होती. अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष शरद भांडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना शिष्यवृती पूर्ववत सुरू केली आहे. शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात पार पडला. या कार्यक्रमाला अरुण वेळापुरे, आनंद डांगरे, राज्याचे युवा अध्यक्ष प्रकाश दादा तवटे, गोविंद अंधारे, चंद्रकांत सरोदे, नंदकुमार शिलवंत, दीपक वनगुजर, रवींद्र शिनगारे, प्रमोद शिनगारे, मंडलेश्वर काळे, पद्मिनीताई काळे, जयंत काळे, मंगेश विभुते, नंदकुमार कोळपकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र येंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्याचे युवा उपाध्यक्ष अनिल आष्टेकर , अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष मंगेश रासने व अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र येंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील युवक मंडळाने अतिशय परिश्रम घेतले. रमेश रासने, सचिन कासार, पवन रासने, विशाल कडुस्कर, विशाल येंडे, शशांक रासने, अनंत रासने, अंकित रासने, अनंत रासने, सचिन वेळापुरे, रोहित पोफळे, अच्युत रासने, सौरभ भांडेकर, कवित रासने, ओंकार डांगरे, प्रवीण भांडेकर व इतर अनेक कार्यकर्त्यांसह कालिका देवी संस्थानचे सर्व पदाधिकारी यांनी उल्लेखनीय कार्य केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कडुसकर यांनी केले. सत्काराची जबाबदारी युवक मंडळाचे पदाधिकारी विशाल येंडे, शशांक रासने, अनंत रासने यांनी पार पाडली. शशांक रासने यांनी आभार मानले. कोरोना महामारीमुळे निधन झालेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

--------

फोटो-२६कासार समाज

अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी.

Web Title: Scholarships finally started for students from the Kasar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.